रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“हार्दिक आणि मी लवकरच…”, अक्षया देवधरने व्यक्त केली भविष्यातील ‘ती’ इच्छा, म्हणाली, “त्याचं प्लॅनिंग…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 20, 2024 | 4:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Lakshmi Niwas serial fame actress Akshaya Deodhar expressed her desire to buy a new house in the future with husband Hardeek Joshi

“हार्दिकच्या साथीने लवकरच नवीन घर घेणार”, अक्षया देवधरने सांगितली ‘ती’ इच्छा

स्वप्नांची पूर्तता ज्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टीशी जोडलेली असते, ती म्हणजे हक्काचं घर घेणं. मेहनतीच्या आणि कमाईच्या बळावर स्वत:चं घर खरेदी करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण झटत असतो. त्यासाठीचे प्रयत्न करत असतो. सामान्य माणसाबरोबरच मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांचेही नवीन घर घेण्याचे स्वप्न असतं. असेच स्वप्नपुर्तीची इच्छा असलेले मराठी कलाकार म्हणजे तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री अक्षया देवधर व अभिनेता हार्दिक जोशी. हार्दिक-अक्षया ही जोडी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि लोकप्रिय झाली. (Akshaya Deodhar desire to buy a new house)

राणादा आणि अंजली या भूमिकांतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. या मालिकेनंतर दोघेही काही मालिका व कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले. अशातच आता अक्षया देवधर पुन्हा एकदा झी मराठीरीलच ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या २३ तारखेपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच मालिकेच्या निमित्ताने मालिकेतील मुख्य अभिनेत्री अक्षया देवधरने इट्स मज्जाशी खास संवाद साधला. यावेळी तिने त्यांना भविष्यात नवीन घर घ्यायची इच्छा व्यक्त केली.  

आणखी वाचा – उस्ताद झाकीर हुसैन अनंतात विलीन, परदेशात पार पडले अंत्यसंस्कार, कुटुंबियांनी जड अंत:करणाने दिला निरोप

याबद्दल अक्षया असं म्हणाली की, “हो, नुकतीच गाडी घेतली. मग हवं तसं काम करायचं आहे. अशीच एक इच्छा आहे ती म्हणजे नवीन घराची. सध्या आमच्या दोघांच्या रडारवर एक इच्छा आहे ती म्हणजे नवीन घर घेण्याची. जसं लक्ष्मी निवासचं नवीन घराचं स्वप्न आहे अगदी तसंच हार्दिक-अक्षयाचे पण घर घेण्याचं स्वप्न आहे. आम्हाला आमच्या स्वप्नातील घर बनवायचं आहे. हार्दिक माझ्यासाठी आणि मी हार्दिकसाठी फक्त घरासाठीच स्वप्न बघत आहे”.

आणखी वाचा – “आता स्वर्गात जाऊन श्रीदेवीला अटक करणार का?”, अल्लू अर्जुनच्या कारवाईवर सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचं भाष्य, म्हणाले, “प्रत्येक कलाकाराने…”

यापुढे ती असं म्हणाली की, “याबद्दल फक्त आम्हालाच माहीत आहे आणि आम्हा दोघांनाही तीच एक इच्छा आहे की, आई-वडिलांचं नाही तर आपल्याला आपलं स्वत:चं घर तयार करायचं आहे. तर त्याचेच नियोजन सध्या सुरु आहे”. दरम्यान, तीन वर्षांच्या ब्रेकनंतर अक्षया पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत अक्षयाची भूमिका काय असेल? याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

Tags: Akshaya Deodhar and Hardeek Joshi her desire to buy a new houseAkshaya Deodhar desire to buy a new houseLakshmi Niwas serial fame actress Akshaya Deodhar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Sukh Mhanje Nakki Kay Asta Off Air Actress Girija Prabhu got emotional and shared some special memories

“त्या शोमधून बाहेर पडले आणि...”, ‘सुख म्हणजे...’ मालिकेच्या निरोपाच्या क्षणी गिरिजा प्रभू भावुक, म्हणाली, “कोरोना काळात...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.