शनिवार, मे 10, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

15 December Horoscope : रविवारी ‘या’ राशीच्या लोकांवर असणार सूर्यदेवाची कृपा, होणार आर्थिक भरभराट, जाणून घ्या…

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 14, 2024 | 8:00 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
15 December 2024 Horoscope Sunday daily horoscope the people of some sign will be blessed by Sun God,

जाणून घ्या रविवारचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा जाणार आहे आणि तुमच्या नशिबात नक्की काय असेल?

15 December Horoscope : १५ डिसेंबर २०२४, रविवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार कर्क राशीचे लोक खूप उत्साही राहतील. कामाच्या ठिकाणी सुरु असलेले अडथळे दूर होतील आणि प्रत्येक कामात यश मिळेल. सिंह राशीच्या लोकांसाठी रविवारचा दिवस आनंदाने भरलेला असेल. कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवाल. जाणून घ्या रविवारचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा जाणार आहे आणि तुमच्या नशिबात नक्की काय असेल? (15 December Horoscope)

मेष  (Aries) :  मेष राशीच्या लोकांसाठी रविवारचा दिवस चांगला जाणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरीच्या ठिकाणी पद आणि प्रतिष्ठा वाढेल आणि तुम्हाला मान-सन्मान मिळेल. सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी रविवारचा काळ शुभ आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

वृषभ (Taurus) :  वृषभ राशीच्या लोकांसाठी रविवारचा दिवस अतिशय शुभ असणार आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या आर्थिक मंदीतून सुटका होण्याची शक्यता आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी यश मिळेल, त्यामुळे मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे. शिक्षणाशी संबंधित लोकांसाठी काळ चांगला आहे.

मिथुन (Gemini) :  मिथुन राशीच्या लोकांसाठी रविवारचा दिवस संमिश्र राहील. तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कोणत्याही मोठ्या प्रकल्पात गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा, अन्यथा भविष्यात नुकसान होऊ शकते. कोणत्याही वादात पडू नका, बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

कर्क (Cancer) : कर्क राशीचे लोक खूप उत्साही असतील. कामाच्या ठिकाणी सुरू असलेले अडथळे दूर होतील आणि प्रत्येक कामात यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील, आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. कोर्टाशी संबंधित कामात यश मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले परिणाम मिळतील.

सिंह (Leo) :  सिंह राशीच्या लोकांसाठी रविवारचा दिवस आनंदाने भरलेला असेल. कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवाल. कामाच्या ठिकाणी सुरू असलेल्या सर्व अडचणी दूर होतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित लोकांना अभ्यासात यश मिळेल.

कन्या (Virgo) :  कन्या राशीच्या लोकांना शारीरिक थकवा जाणवेल. आर्थिक परिस्थिती खूप गुंतागुंतीची होऊ शकते. तुम्ही तुमच्या वरिष्ठांच्या टीकेला बळी पडू शकता, कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नका. पैशाचे व्यवहार आणि कर्जासंबंधीच्या बाबतीत सावध राहण्याची गरज आहे.

आणखी वाचा – ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडचं कोकणात याठिकाणी झालं लग्न, अवाढव्य खर्च न करता साधेपणात सोहळा, फोटो व्हायरल

तूळ (Libra) :   तूळ राशीच्या लोकांसाठी रविवारचाचा दिवस शुभ राहील. आर्थिक स्थिती सुधारेल. कामाच्या ठिकाणी नशिबाची साथ मिळेल, सर्व कामे सहज पूर्ण होतील आणि आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होईल.

वृश्चिक (Scorpio) :  वृश्चिक राशीचे लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल, ज्यामुळे आर्थिक लाभाची संधी मिळेल. तुमची सकारात्मक विचारसरणी आणि कार्यक्षेत्रात पूर्ण आत्मविश्वास यामुळे तुम्हाला चांगली संधी मिळू शकते. व्यावसायिक लोकांना नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर रविवारचा दिवस फायदेशीर ठरेल.

धनु (Sagittarius) :  धनु राशीच्या लोकांसाठी रविवारचा दिवस चांगला राहील. आरोग्य सुधारेल आणि आर्थिक स्थिती चांगली राहील. कामाच्या ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास सध्या सुरू असलेल्या अडचणी दूर होतील आणि सर्व कामे चांगल्या प्रकारे पार पडतील. जीवनात गोडवा राहील.

आणखी वाचा – Video : लग्न मंडपात धमाकेदार एन्ट्री, बायकोला उचलून घेत नाचला अन्…; ‘शिवा’ फेम शाल्व किंजवडेकरने धरला ठेका, व्हिडीओ व्हायरल

मकर (Capricorn) :  मकर राशीच्या लोकांसाठी रविवारचा दिवस आनंदाने भरलेला असेल. तुमचे आरोग्य चांगले राहील आणि तुम्ही उर्जेने परिपूर्ण असाल. घाईघाईने कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका, अन्यथा भविष्यात समस्या उद्भवू शकतात. तुम्हाला कामाच्या ठिकाणी नाराजीचा सामना करावा लागू शकतो.

कुंभ (Aquarius) :  कुंभ राशीच्या लोकांसाठी काही अडचणी येऊ शकतात. पण तुमच्या सकारात्मक आणि संतुलित विचारातून तुम्हाला तुमचा मार्ग सापडेल. काही काळापासून कुटुंबात सुरू असलेले गैरसमज तुमच्या मध्यस्थीने दूर होतील. कोणतीही नवीन गुंतवणूक टाळा, अन्यथा नुकसान होऊ शकते.

मीन (Pisces) :  सामाजिक कार्यात तुमचे विशेष योगदान राहील आणि तुमचा सन्मानही वाढेल. यावेळी तुम्ही अनेक कामांमध्ये व्यस्त असाल. त्यामुळे सावध रहा. अनावश्यकपणे वाढणारे खर्च तुम्हाला त्रास देऊ शकतात, त्यामुळे तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात सुव्यवस्था राखणे आवश्यक आहे.

Tags: 15 December Horoscopedecember 2024 horoscopeHoroscopemonthly horoscope 2024
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

operation sindoor soldier news
Women

आठ महिन्याची लेक कडेवर घेत पतीला अखेरचा निरोप, शहीद जवान सचिन वनांजेंच्या पत्नीच्या अश्रूंचा बांध फुटला अन्…; मुखाग्नी देताना…

मे 10, 2025 | 2:32 pm
Jawan Murali Naik
Social

शेवटचा व्हिडीओ कॉल, मजुरी करणारे वडील अन्…; अवघ्या विशीत वीरमरण आलेल्या मुरली नाईक यांच्या कुटुंबियांचा टाहो, एकुलता एक लेक आणि…

मे 10, 2025 | 2:01 pm
Arijit Singh
Entertainment

मनाचा मोठेपणा! अरिजित सिंगच्या हॉटेलमध्ये सर्वसामांन्यांना इतक्या रुपयांत पोटभर जेवण, गायकाच्या निर्णयाचं कौतुक

मे 10, 2025 | 12:41 pm
akshay kelkar wedding
Entertainment

सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, शाही विवाहसोहळ्याची झलक समोर, लूकची जोरदार चर्चा

मे 10, 2025 | 11:26 am
Next Post
Salman Khan show Bigg Boss 18 will end in the month of January and date has been revealed see the details

Bigg Boss 18 'या' दिवशी घेणार प्रेक्षकांचा निरोप, तारीखही आली समोर, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.