रविवार, मे 11, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Allu Arjun Arrested : अल्लू अर्जुनला अटक, ‘पुष्पा २’मुळे प्रकरण अंगलट, पण असं नक्की काय घडलं?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 13, 2024 | 1:23 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Allu Arjun Arrest

अल्लू अर्जुनला अटक, 'पुष्पा २'मुळे प्रकरण अंगलट, पण असं नक्की काय घडलं?

Allu Arjun Arrested : अल्लू अर्जुनला अटक, ‘पुष्पा २’मुळे प्रकरण अंगलट, पण असं नक्की काय घडलं? : तेलगू चित्रपट अभिनेता अल्लू अर्जुन बाबत मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेत्याला ४ डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ३९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता आणि तिचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणानंतर पोलिसांनी संध्या थिएटर व्यवस्थापन, अभिनेता आणि त्याच्या सुरक्षा पथकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. अधिका-यांनी सांगितले होते की, चित्रपटाची टीम प्रीमियरसाठी येणार असल्याची कोणतीही पूर्व सूचना पोलिसांना नव्हती, अशी तक्रार पोलिसांकडून करण्यात आली.

या महिन्याच्या सुरुवातीला, हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान घडलेल्या दुःखद घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. संगीत दिग्दर्शक देवी श्री प्रसाद यांच्यासमवेत कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अभिनेता अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी प्रचंड गर्दी जमल्याने गोंधळ उडाला. त्यानंतर झालेल्या गोंधळात थिएटरचे मुख्य गेट कोसळले, परिणामी चेंगराचेंगरी झाली. एका ३५ वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागला आणि तिचा ९ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला.

आणखी वाचा – प्रसाद खांडेकरने बायकोला लग्नाच्या वाढदिवसाचा दिलं सरप्राइज, रिटर्न गिफ्ट म्हणूनही मिळाली महागडी वस्तू, फोटो व्हायरल

याच प्रकरणी अल्लू अर्जुनला ताब्यात घेतलं असल्याचं पाहायला मिळत आहे. CNN व News18 नुसार, अल्लू अर्जुनविरुद्ध हैदराबाद चेंगराचेंगरीप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता. याशिवाय, संध्या थिएटरवर फौजदारी निष्काळजीपणासाठी कलम 105 आणि 118(1) BNS सह गुन्हा दाखल करण्यात आला होता. अल्लू अर्जुननेही या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करत शोकाकुल कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या होत्या.

आणखी वाचा – गेल्याचवर्षी सासूबाईंचं निधन, सासरच्या मंडळींकडून लाड अन्…; पहिल्यांदाच सासरबाबत बोलली रेश्मा शिंदे, दोघांची भाषा वेगळी पण…

“संध्या थिएटरमधील दुःखद घटनेने खूप दुःख झाले. या अकल्पनीय कठीण काळात शोकाकुल कुटुंबाप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना आहेत. मी त्यांना खात्री देऊ इच्छितो की ते या दुःखात एकटे नाहीत आणि कुटुंबाला वैयक्तिकरित्या भेटतील. त्यांच्या दुःखासाठी जागेच्या गरजेचा आदर करताना, मी त्यांना या आव्हानात्मक प्रवासात नेव्हिगेट करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यास कटिबद्ध आहे”, असं अभिनेता म्हणाला. यावेळी त्याने कुटुंबाला २५ लाख रुपयांची भेटही दिली. ‘पुष्पा २’ चित्रपटाला जगभरात भरघोस प्रतिसाद मिळत असताना अल्लू अर्जुनला अटक झाल्याची बातमी धक्का देणारी आहे.

Tags: allu arjunAllu Arjun Arrestpushpa 2
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Hina Khan Received Threats
Entertainment

धर्म, पाकिस्तान अन् त्रास; मुस्लिम म्हणून हिना खानला थेट धमक्या, म्हणाली, “सीमेपलीकडील लोकांवरही प्रेम केलं पण…”

मे 10, 2025 | 6:17 pm
Soldier Viral Video
Social

जवानांना पाहताच चिमुकलीने केला नमस्कार, सॅल्युट करायचं विसरली म्हणून पुन्हा आली अन्…; Video व्हायरल

मे 10, 2025 | 5:11 pm
Pakistani Anchor Viral Video
Entertainment

सेलिब्रिटींना शिव्या, पाकिस्तानी सैन्याचं दुःख सांगत रडली अन्…; अँकरचा कॅमेऱ्यासमोर ड्रामा, Video व्हायरल

मे 10, 2025 | 4:33 pm
operation sindoor soldier news
Women

आठ महिन्याची लेक कडेवर घेत पतीला अखेरचा निरोप, शहीद जवान सचिन वनांजेंच्या पत्नीच्या अश्रूंचा बांध फुटला अन्…; मुखाग्नी देताना…

मे 10, 2025 | 2:32 pm
Next Post
pushpa 3 tagline

‘पुष्पा २’च्या यशानंतर तिसरा भागही लवकरच येणार, खुद्द अल्लू अर्जुनचाच खुलासा, नवीन टॅगलाइनची चर्चा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.