रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नातीसाठी आजीचं कौतुकास्पद पाऊल, दीपिका पदुकोणची लेक तीन महिन्यांची होताच सासूने दान केले केस, कारण…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 11, 2024 | 11:16 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ranveer Singh  Mother

नातीसाठी आजीचं कौतुकास्पद पाऊल, दीपिका पदुकोणची लेक तीन महिन्यांची होताच सासूने दान केले केस,

Ranveer Singh  Mother : बॉलिवूड सिनेसृष्टीतील लाडक्या जोडींपैकी एक म्हणजे रणवीर सिंग व दीपिका पदुकोण. बी टाऊनमधील ही जोडी नेहमीच चर्चेत असते. बी टाऊनमधील या जोडीला प्रेक्षकांचंही भरभरुन प्रेम मिळालं. रणवीर व दीपिका हे त्यांच्या लेकीच्या जन्मानंतर बरेच चर्चेत असलेले पाहायला मिळाले. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचे २०१८ साली लग्न झाले. त्यांनतर ८ सप्टेंबर २०२४ रोजी ते त्यांची लेक दुआचे पालक झाले. आता दुआ तीन महिन्यांची झाली आहे. रणवीरची लेक तीन महिन्यांची होताच रणवीरच्या आईने म्हणजेच दीपिकाच्या सासूने असे काही केले, ज्याचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. नातीसाठी तिच्या आजीने जे काही केले ते खूप वाखाणण्याजोगं आहे. आणि तिच्या कृतीची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

नात दुआ तीन महिन्यांची होताच रणवीरची आई अंजू भवनानीने तिचे केस दान केले होते. त्याने इंस्टाग्राम स्टोरीवर काही फोटो व पोस्ट शेअर केल्या आहेत. रणवीर सिंगच्या फॅन क्लबने त्यांच्या सोशल मीडिया पेजवर हे शेअर केले आहे. रणवीरच्या आईने एक चिठ्ठीही लिहिली आहे, ज्यामध्ये तिने म्हटले आहे की तिचे केस दान करुन, तिला आशा आहे की कदाचित अशा लोकांना मदत होईल ज्यांना यावेळी अडचणी येत आहेत.

आणखी वाचा – Paaru Marathi Serial : मोहनचा अपघात घडवून आणण्यात अनुष्काची चाल, पारूसमोर येणार का सत्य?, मोठा ट्विस्ट

तर एका पोस्टमध्ये ती केस कापतानाही दिसत आहे. यानंतर ती हातात कापलेली वेणी फ्लाँट करताना दिसली. ही पोस्ट आणि रणवीरच्या आईचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पोस्टमध्ये तिने असेही म्हटले आहे की, नात दुआ जसजशी मोठी होते, तसतसे आजूबाजूच्या प्रत्येकाला दुआच्या आनंद आणि सौंदर्यातून देवीची शक्ती व दयाळू स्वभाव जाणवत आहे. अंजू भवनानीच्या या कृतीने तिने अनेकांची मन जपली आहेत.

आणखी वाचा – सुनील पाल यांनी स्वत:च रचला स्वतःच्या अपहरणाचा खेळ?, ऑडिओ व्हायरल होताच म्हणाले, “डोक्यावर बंदूक असेल तर…”

नुकतीच म्हणजेच ९ डिसेंबरला दीपिका मुंबई विमानतळावर दिसली होती. यावेळी तिच्याबरोबर मुलगी दुआही होती. आई व मुलगी एकत्र दिसण्याची ही पहिलीच वेळ होती. दीपिकाने तिची मुलगी दुआला छातीशी धरले होते. मात्र, यावेळी त्यांनी दुआचा चेहरा लपवून ठेवला. अद्याप रणवीर व दीपिकाने त्यांच्या लेकीचा चेहरा दाखवलेला नाही. त्यामुळे सगळ्यांना या जोडप्याच्या लेकीला पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे.

Tags: bollywood newsRanveer Singh  Motherranveer singh and deepika padukone daughter
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Allu Arjun Pushpa 2 movie another incident suspicious death of a man in the theatre Andhra Pradesh

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'चा वादाचा भोवरा, चित्रपटगृहात आढळला संशयास्पद मृतदेह, नेमकं प्रकरण काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.