शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’चा वादाचा भोवरा, चित्रपटगृहात आढळला संशयास्पद मृतदेह, नेमकं प्रकरण काय?

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 11, 2024 | 11:29 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Allu Arjun Pushpa 2 movie another incident suspicious death of a man in the theatre Andhra Pradesh

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २' आणखी एका वादात, चित्रपटगृहात आढळला संशयास्पद मृतदेह, जाणून घ्या...

अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा-२’ चित्रपट प्रदर्शनापासून चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट तिकीटबारीवर दमदार कामगिरी करत आहे. अनेक चित्रपटांना ‘पुष्पा-२’ने मागे टाकले आहे. तसंच हा चित्रपट अनेकांची वाहवा मिळवत आहे. असं असलं तरी चित्रपटाच्या सुरुवातीपासून अनेक वाद होताना पाहायला मिळत आहेत. प्रीमियरला झालेल्या महिला चाहत्याच्या मृत्यूने या चित्रपटाच्या शुभारंभाच्याच दिवशी गालबोट लागले. त्यानंतर करणी सेनेने या चित्रपटाच्या निर्मात्यांना घरात घुसून मारण्याची धमकी दिली. (Pushpa 2 movie man death in the theatre)

अशातच आता या चित्रपटाबाबत आणखी एक घटना समोर येत आहे ती म्हणजे आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील रायदुर्गम शहरातून एका मोठ्या अपघाताचे वृत्त येत आहे. शहरातील एका चित्रपटगृहात ‘पुष्पा २’ प्रदर्शनादरम्यान एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. चित्रपटगृहात बसलेले लोक चित्रपटाचा आनंद लुटत असताना ही घटना उघडकीस आली आणि या व्यक्तीच्या मृत्यूची बातमी समोर येताच चित्रपटगृहात उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली. ही घटना मंगळवार, १० डिसेंबर रोजी सायंकाळची आहे.

View this post on Instagram

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

आणखी वाचा – मराठी कलाकारांची लगीनघाई! ‘तुला शिकवीन…’ फेम अभिनेत्रीही अडकणार विवाहबंधनात, पार पडला मेहंदी सोहळा

आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील एका चित्रपटगृहात सापडलेल्या व्यक्तीच्या मृतदेहामुळे परिसरात खळबळ उडाली. मध्यनप्पा असे मृताचे नाव आहे. मध्यनप्पा हे उदेगोलम गावचे रहिवासी होते आणि त्यांना चार मुले आहेत. पोलिसांनी पीटीआयला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ३५ वर्षीय व्यक्तीला दारूचे व्यसन होते आणि तो चित्रपटगृहात पोहोचण्यापूर्वीच दारूच्या नशेत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यनप्पाने चित्रपटादरम्यान जास्त दारू प्यायली होती, त्यानंतर तो मृत आढळून आला.

आणखी वाचा – सुनील पालनंतर आणखी एका सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचे अपहरण, कार्यक्रमासाठी बोलावलं अन्…; नेमकं काय झालं?

 ही घटना संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली, जेव्हा तेथील एका स्वच्छता कर्मचाऱ्याने त्या व्यक्तीला संशयास्पद अवस्थेत पाहिले. रायदुर्गमचे पोलीस उपअधीक्षक रवी बाबू यांनी सांगितले की, सध्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकलेले नाही. या घटनेबाबत पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम १९४ अन्वये गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.  जेव्हा त्या व्यक्तीचे कुटुंब चित्रपटगृहात पोहोचले तेव्हा त्या माणसाचे निधन झाले होते.  

Tags: allu arjunPushpa 2 movie man death in the theatrePushpa 2 The Rule
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
Amitabh Bachchan on Jaya Bachchan

जया बच्चन यांना खूपच घाबरतात अमिताभ बच्चन, लग्नाच्या ५० वर्षांनंतरही तेच वाद, म्हणाले, "एक शब्दही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.