मराठी सिनेविश्वात सध्या लगीनघाई सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. लाही दिवसांपूर्वी अभिनेत्री रेश्मा शिंदे विवाहबंधनात अडकली. त्यानंतर आता लवकरच अभिनेता शाल्व किंजवडेकर श्रेया डफळापुरकरबरोबर लग्नबंधनात अकडणार आहे. तसंच अभिनेता किरण गायकवाड व अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर आणि अंबर गणपुले व शिवानी सोनार या जोड्याही विवाहबंधनात अडकणार आहे. याचबरोबर आता आणखी एक अभिनेत्री विवाहबंधनात अडकणार आहे आणि ही अभिनेत्री म्हणजे विरिशा नाईक. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत ‘चंचला’ हे पात्र अभिनेत्री विरीशा नाईक साकारत आहे. खऱ्या आयुष्यात आता ही अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. (Virisha Naik Mehandi)
दिवाळीत विरीशा व प्रशांत यांनी व्हिडीओ शेअर करत लवकरच लग्न करणार असं म्हटलं होतं. त्यामुळे त्यांचे अनेक चाहते मंडळी त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दोघे डिसेंबर महिन्यात विवाहबंधनात अडकणार असल्याचे समोर आले होते. अशातच आता अभिनेत्रीचा हळदी समारंभ पार पडला आहे. विरिशाने याचे काही फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अभिनेत्रीच्या हातावर आकर्षक अशी मेहंदी काढलेली दिसत आहे. या मेहंदीमध्ये राजमहाल व मोराची आकर्षक डिझाईन पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – सुनील पालनंतर आणखी एका सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचे अपहरण, कार्यक्रमासाठी बोलावलं अन्…; नेमकं काय झालं?
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका गेल्या दीड वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेत खलनायिकेच्या भूमिका साकारणार्या भुवनेश्वरी, दुर्गेश्वरी आणि चंचला यासुद्धा घराघरांत लोकप्रिय झाल्या आहेत. १५ ऑगस्ट रोजी प्रशांत निगडे आणि विरिशा नाईक यांचा साखरपुडा पार पडला होता. विरीशाचा होणारा पती हादेखील एक सुप्रसिद्ध अभिनेता आहे आणि त्याचे नाव प्रशांत निगडे असं आहे.
आणखी वाचा – 11 December Horoscope : मेष, कर्क राशीच्या लोकांसाठी बुधवारचा दिवस खास, धनलाभ अन् बढतीची शक्यता, जाणून घ्या…
दरम्यान, दिवाळीत विरीशा व प्रशांत यांनी व्हिडीओ शेअर करत लवकरच लग्न करणार असं म्हटलं होतं. त्यामुळे त्यांचे अनेक चाहते मंडळी त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दोघे डिसेंबर महिन्यात विवाहबंधनात अडकणार असल्याचे वृत्त आहे. मात्र या दोघांनी त्यांच्या लग्नाची नेमकी तारीख अजून सांगितलेली नाही. त्यामुळे चाहते मंडळी या दोघांच्या लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत.