रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

गिफ्टचा वर्षाव, धमाल सेलिब्रेशन अन्…; ऐश्वर्या नारकरांच्या बर्थडेचं कुटुंबियांसह सेटवरही युनिक सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 9, 2024 | 12:57 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aishwarya Narkar Birthday

ऐश्वर्या नारकरांच्या बर्थडेचं कुटुंबियांसह सेटवरही युनिक सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल

Aishwarya Narkar Birthday : मराठी मालिकाविश्वात नेहमीच चर्चेत असणाऱ्या आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर. ऐश्वर्या नारकर यांनी आजवर अनेक मराठी मालिका, चित्रपट व वेबसीरिजमधून महत्त्वपूर्ण कामगिरी करत प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. अभिनेत्रीने त्यांच्या अभिनय व सौंदर्याने ९० चं दशक गाजवलं. त्या काळातील त्यांच्या अनेक भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. इतकंच नव्हे तर आजही त्या तितक्याच सुंदर दिसत असून प्रेक्षक त्यांच्या सौंदर्यावर भुळलेले असतात. ऐश्वर्या यांनी त्यांची पन्नाशी ओलांडली असली तरी त्यांच्यात असलेला उत्साह हा तरुणाईला लाजवणारा आहे. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या सर्वांच्याच लाडक्या अभिनेत्री आहेत.

सध्या ऐश्वर्या या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहेत. ऐश्वर्या या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. या मालिकेतील त्यांच्या भूमिकेचं विशेष कौतुक होताना पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर ऐश्वर्या बर्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच त्या काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच ऐश्वर्या यांनी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

आणखी वाचा –अमिताभ बच्चनकडून ‘पुष्पा 2’ फेम अल्लू अर्जुनचं कौतुक, ‘त्या’ व्हिडीओनंतर खास पोस्ट शेअर, म्हणाले, “माझ्या लायकीपेक्षा…”

View this post on Instagram

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

ऐश्वर्या यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसाची झलक पाहायला मिळत आहे. इतकंच नाही तर ऐश्वर्या यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये वाढदिवसानंतर झालेलं सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे. सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेच्या टीमने ऐश्वर्या यांचा अगदी दणक्यात वाढदिवस साजरा केला. खास भेटवस्तू, केक, पुष्पगुच्छ देत त्यांचा वाढदिवस साजरा झालेला पाहायला मिळाला. शिवाय व्हिडीओमध्ये घरी साजरा केलेल्या वाढदिवसाची झलकही पाहायला मिळतेय. यावेळी त्यांचे पती अविनाश नारकर बायकोला केक भरवताना दिसत आहेत.

आणखी वाचा – “तुझ्याबरोबरच तुझ्या कुटुंबालाही मी मानतो अन्…”, डीपी-अंकिता वालावलकरची घट्ट मैत्री, एकमेकांशी साथ, मैत्रीची सोशल मीडियावर तुफान चर्चा

ऐश्वर्या यांनी हा व्हिडीओ शेअर करत साऱ्यांचे आभार मानले आहेत. “सगळ्यांना धन्यवाद. तुम्ही मला विशेष प्रिय आहात. सोनेरी क्षण निर्माण करण्यात मला मदत केली. ज्या आठवणी मी कायम जपत राहीन. तुम्ही सर्व महत्त्वाचे आहात. विशेष विशेष धन्यवाद”, असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

Tags: aishwarya narkaraishwarya narkar birthdaymarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 winner Suraj Chavan met newly elected Deputy Chief Minister Ajit Pawar and congratulat him

"दादांनी माझ्या घराचे काम सुरु केले आणि...", अजित पवारांना भेटायला मुंबईत आला सूरज चव्हाण, म्हणाला, "देवमाणूस..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.