स्टार प्रवाह वाहिनीवरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. कानिटकरांच्या घराभोवती फिरणार या मालिकेचं कथानक असून ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. असेच या मालिकेतील अप्पू आणि शशांक या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलंय. अप्पूची भूमिका अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर साकारतेय तर शशांक च्या भूमिकेत चेतन वडनेरे पाहायला मिळतोय. या मालिकेतील अप्पू म्हणजेच कानिटकरांची सून विशेष चर्चेत आहे.(Dnyanada Ramtirthkar Troll)
अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर सोशल मीडियावरही विशेष सक्रीय असते. सोशल मीडियावरून ती विविध फोटो शेअर करत चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आणि मालिका विश्वातील आयुष्याविषयी अपडेट देत राहते. ज्ञानदाने नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे तिच्या या फोटोतील कपड्यावरुन तिला ट्रोल करण्यात आलं आहे. ज्ञानदाला बरेचदा वजनावरुन ट्रोल करण्यात आलं आहे. आता ज्ञानदाला तिला तिच्या कपड्यावरुन बोलणाऱ्याला चांगलच सुनावलं आहे.
हे देखील वाचा – “इतका रिकामी असतोस का?” म्हणणाऱ्या नेटकऱ्याला सोहमने दिलं उत्तर
ज्ञानदाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून टीशर्ट आणि शॉर्ट पँटमधील फोटो शेअर केलेत. यांत तिने रंगीबेरंगी टीशर्ट परिधान केलं आहे. या फोटोवरून ज्ञानदाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. ‘कापड कमी पडलं वाटतं’. असं एका युजरने कमेंट करत म्हटलं आहे, तेव्हा ज्ञानदाने असं उत्तर दिलं की, ‘नाही, तुमच्या विचारांची पोच कमी पडली’.(Dnyanada Ramtirthkar Troll)
दरम्यान संबंधित युजरने त्याच्या कमेंटबाबत स्पष्टीकरणही दिले. त्याने असे लिहिले की, ‘तसं नाही, वेगवेगळ्या रंगांचे टीशर्ट आहे, म्हणून अशी कमेंट केली आहे.’ यावर पुन्हा प्रतिउत्तर देत ज्ञानदा म्हणाली, ‘अशी comment करताना लाज वाटली पाहिजे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात राहतो. आणि महाराजांची शिकवण आहे कोणतीही स्त्री ही आपल्या आई – बहीण प्रमाणे आहे.'(Dnyanada Ramtirthkar Troll)
ज्ञानदाने दिलेल्या उत्तराने कमेंट करणाऱ्याची बोलतीच बंद केली आहे.
