कलाकार मंडळींची मुलंही आई वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकत सिनेसृष्टीत काम करत असतात. अभिनयाची आवड वा कलेची आवड मुळात घरात वारसा असल्याने लहानपणापासून त्यांच्या अंगी रुजू झालेली असते. अशी बरीच कलाकार मंडळी आहेत ज्यांच्या मुलांनी कलाक्षेत्रात आपला प्रवास सुरु केला आहे. यांत अभिनेता आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा अभिनेता सोहम बांदेकर याने काही वर्षांपूर्वी आई वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. सोहमने त्याचा मनोरंजन विश्वातील प्रवास हा मालिकेपासून सुरु केला.(Soham Bandekar Angry)
स्टार प्रवाह वाहिनीवरील नवे लक्ष्य या मालिकेत सोहम बांदेकर झळकला होता. पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत तो दिसला होता. त्याचप्रमाणे सोहमने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या बाईपण हरी देवा या चित्रपटातही पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. या चित्रपटात सोहमची आई सुचित्रा बांदेकर या मुख्य भूमिकेत दिसल्या.
पाहा नेटकऱ्याला सोहमने सुनावले खडेबोल (Soham Bandekar Angry)
सोहम हा सोशल मीडियावर ही कायमच सक्रीय असतो. सोहमचा चाहता वर्ग ही खूप मोठा आहे. बरेचदा सोहम त्याच्या आगामी प्रकल्पाबद्दल माहिती शेअर करत असतो. अशातच सोशल मीडियावरून एका चाहत्याला सोहमने सडेतोड उत्तर दिले आहे. त्यामुळे सोहम सध्या चर्चेत आला आहे. नुकतंच सोहमने त्याच्या चाहत्यांसाठी Ask me anything या सेशनचे आयोजन केले होते. यावेळी सोहमने त्याच्या चाहत्यांच्या सर्वच प्रश्नांना उत्तर दिली.(Soham Bandekar Angry)
हे देखील वाचा – ‘आई कुठे काय करते’ मालिकेला अरुंधती देणार होती नकार’
या सेगमेंट दरम्यान एका चाहत्याने सोहमला “इतका रिकामी असतोस का?” असा प्रश्न विचारला आहे. त्यावर सोहमने फारच हटके पद्धतीने त्याला उत्तर दिले आहे. ‘निकामी असण्यापेक्षा रिकामी परवडला”, असे सोहमने यावेळी उत्तर देत म्हटलं आहे.(Soham Bandekar Angry)
सोहमने नवे लक्ष्य या मालिकेतून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केलं. याशिवाय सोहम प्रोडक्शन नावाने सोहमच स्वतःच प्रोडक्शन हाऊस आहे ते देखील सोहमच्या देखरेखीखाली चालत.
