सध्या देशभरात सर्वत्र दाक्षिणात्य चित्रपट ‘पुष्पा २’ची चर्च सुरु आहे. देशभरात या चित्रपटाने चांगलीच कामई केली आहे. ५ डिसेंबरला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ६८ कोटी रुपयांची कमाई करत आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. सोशल मीडियावर सध्या याबद्दलच चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. दरम्यान या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी ४ डिसेंबर रोजी स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आली होती. यावेळी खूप मोठा अनुचित प्रकार घडला होता. बुधवारी रात्री, आरटीसी चौकात असलेल्या संध्या थिएटरमध्ये या चित्रपटाचा प्रीमियर शो झाला, ज्यामध्ये एका ३९ वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागला. तर एका मुलाची प्रकृती गंभीर झाली होती. (allu arjun on Hyderabad incedence)
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, अल्लू अर्जुनच्या आगमनाची बातमी पसरताच गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. अभिनेत्याच्या जवळ जाण्यासाठी अनेकांची धावपळ सुरु झाली होती. अभिनेत्याच्या सुरक्षेसाठी त्याला पोलिस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घेरले होते. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पोलिस जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्जदेखील करण्यात आला होता. या प्रकरणी अल्लू अर्जुन, त्याची सुरक्षा संस्था व थिएटरच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. याबद्दल आता अल्लू अर्जुनने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Deeply heartbroken by the tragic incident at Sandhya Theatre. My heartfelt condolences go out to the grieving family during this unimaginably difficult time. I want to assure them they are not alone in this pain and will meet the family personally. While respecting their need for… pic.twitter.com/g3CSQftucz
— Allu Arjun (@alluarjun) December 6, 2024
महिलेच्या मृत्यूप्रकरणी अल्लू अर्जुनने एक व्हिडीओ शेअर करत मृत महिलेच्या कुटुंबाला पाठिंबा देणार असल्याचे सांगितले आहे. तसेच या घटनेने त्याला खूप दु:ख झाले असल्याचेही त्याने सांगितले. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अर्जुन म्हणाला की, “मृत महिलेच्या कुटुंबाला तो स्वतः प्रत्यक्षात जाऊन भेटणार आहे. या कठीण प्रसंगी महिलेचे कुटुंबं एकटे नाही. मी त्यांच्याबरोबर असणार आहे. कुटुंबासाठी जे काही करता येईल ते मी सगळं करेन”.
पुढे तो म्हणाला की, “मी मृत महिलेच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपयांची मदत करणार आहे. तसेच उपचार व औषधांचा सर्व खर्चदेखील करणार आहे”. दरम्यान संध्या थिएटरमध्ये घडलेल्या या घटणेबद्दल महिलेच्या कुटुंबीयांनी चिक्काडपल्ली पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती. तसेच महिलेच्या पतीने ‘इटाइम्स’बरोबर संवाद साधत या घटणेला अल्लू अर्जुनला जबाबदार असल्याचे म्हणाला होता.