कलाकार मंडळी म्हटलं की त्यांचा चाहतावर्ग हा आलाच. एखाद्या कलाकाराला एखादी मिळालेली भूमिका ही एका उंचीवर नेऊन ठेवते याची बरीच उदाहरणे आहेत. कलाकारांनी साकारलेल्या भूमिकांना लोकप्रियता मिळते मात्र ती भूमिका साकारण्याआधी प्रत्येक कलाकार भूमिकेचा अभ्यास करतो. बर एखादी भूमिका त्यात चालून आली की खाजगी आयुष्यामुळे बरेचदा कलाकारांना त्या भूमिकेचा त्याग ही करावा लागतो. असच काहीस घडलं होत आई कुठे काय करते फेम अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरसोबत.(Madhurani Prabhulkar Incident)
‘आई कुठे काय करते’ ही मालिका कित्येक वर्षांपासून टीआरपीच्या शर्यतीत अव्वल ठरत असून या मालिकेचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. मालिकेत आलेल्या वेगवेगळ्या वळणांमुळे ही मालिका पाहणं रंजक ठरतंय. या मालिकेत मधुराणी ही अरुंधती ही भूमिका साकारतेय. अरुंधती या पात्रामुळे मधुराणी हिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली आहे. एका सर्वसामान्य स्त्री च्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींचा सामना करण्याचे धैर्य स्त्री मध्ये असते ते कास वापरात आणलं जात हे या मालिकेतून अरुंधती या पात्रातून समजतंय.
पाहा का दिला होता मधुराणीने अरुंधती हे पात्र करण्यास नकार (Madhurani Prabhulkar Incident)
अरुंधती या पात्राला घेऊन मात्र मधुराणी हिने एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. अरुंधती ही भूमिका जेव्हा मधुराणीसाठी चालून आली तेव्हा सुरुवातीला ही भूमिका करायला मधुराणी नकार देणार होती. मधुराणीच्या लेक अजून लहान आहे, त्यामुळे तिची गैरसोय होता कामा नये, तिला वेळ देता यावा असं मधुराणी हिला वाटत होत. या कारणास्तव मधुराणी हिने मालिकेला नकार देण्याचं ठरवलं होत.(Madhurani Prabhulkar Incident)
हे देखील वाचा – सिडनीमध्ये मराठीचा डंका, निवेदिता यांची खास पोस्ट
मधुराणी या मालिकेला नकार देतेय हे जेव्हा तिचे पती प्रमोद प्रभुलकर यांना कळलं तेव्हा त्यांनी तिची समजूत काढली. मी लेकीची काळजी घेईन, तू मालिका कर असं आश्वासनही त्यांनी मधुराणी हिला दिलं. पतीने दिलेल्या आत्मविश्वासानंतर मधुराणीने मालिकेला होकार दिला. हे मालिका मधुराणी हिने स्वीकारली आणि तिच्या भूमिकेनं तिने प्रेक्षकांचं मनही जिंकलं.
