अभिनेता विक्रांत मेस्सीने सोमवारी 2 डिसेंबरला अभिनयातून संन्यास घेत असणारी पोस्ट केली होती आणि त्यानंतर मात्र २४ तासातच त्यांने आपल्या केलेल्या वक्तव्याबद्दल घुमजाव केलेले आहे. अवघ्या २४ तासांमध्ये यूटर्न घेत विक्रांतने आपल्या पोस्टचा चुकीचा अर्थ काढला आहे, असे म्हटले. ना मी निवृत्ती घेतली, ना मी इंडस्ट्रीला रामराम ठोकला आहे. माझ्या पोस्टचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. मला फक्त एक ब्रेक हवा आहे, असे विक्रांतने म्हटले. विक्रांतने काही चित्रपट साईन केलेले असून त्याचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर तो ब्रेक घेणार आहे, असेही त्याने सांगितले. अशातच आता तो पुन्हा एकदा शूटिंगवर पुन्हा परतला आहे. (Vikrant Massey Started Shooting)
विक्रांत मेस्सी पुन्हा एकदा सेटवर परतला आहे. त्याने नुकतेच शनाया कपूरबरोबर डेहराडूनमध्ये ‘आँखों की गुस्ताखियां’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. डेहराडूनमध्ये शूटिंग सुरू झाल्यानंतर विक्रांत मेस्सीचा उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याबरोबरचा त्यांच्या भेटीचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ते एकमेकांना हस्तांदोलन करताना आणि बोलताना दिसत आहेत.
विक्रांत मेस्सीने डेहराडून येथे ‘आँखो की गुस्ताखिया’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या चित्रपटात शनाया कपूर मुख्य भूमिकेत आहे. त्याचवेळी, संजय कपूर आणि महीप कपूर यांची मुलगी शनाया या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. ‘आँखों की गुस्ताखियां’ या चित्रपटात विक्रांत एका संगीतकाराची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट २०२५ मध्ये रिलीज होऊ शकतो.
दरम्यान, विक्रांतने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर त्याचे चाहते नाराज झाले होते. मात्र त्याच्या निवृत्तीपूर्वी ‘झिरो से रीस्टार्ट’ हा चित्रपट येणार आहे. जो ’12th फेल’चा सिक्वेल असेल. याशिवाय तो ‘यार जिगरी’मध्येही दिसणार आहे. सध्या या चित्रपटांच्या प्री-प्रॉडक्शनचे काम सुरू आहे. त्यामुळे त्याच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.