शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : “म्हाताऱ्यांना जगण्याची उमेद दिलीस”, सिंबाला भेटायला चिमकुल्यांपासून ते वयोवृद्धांची गर्दी, साईराजची तुफान क्रेझ

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 3, 2024 | 12:36 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Appi Amchi Collector serial fame Simmba aka child actor Sairaj Kendre praised by old grandmother video viral on social media.

“म्हाताऱ्या माणसाला उमेद दिलीस” म्हणत आजींनी केलं लाडक्या सिंबाचं कौतुक, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

२०२३ मध्ये गणपतीच्या दिवसांत ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं होतं. हे मूळ गाणं माऊली व शौर्या घोरपडे या दोन भावंडांनी गायलं होतं. परंतु, या गाण्यावरचा बालकलाकार साईराज केंद्रेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला होता. साईराजचे गोंडस व निरागस हावभाव पाहून सगळेच थक्क झाले होते. यामुळे सोशल मीडियावर सर्वत्र साईराजची चर्चा चालू होती. अशातच ‘अप्पी आमची कलेक्टर’ या लोकप्रिय मालिकेत साईराजची एन्ट्री झाली. (Sairaj Kendre Video)

‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत साईराजने अमोल ऊर्फ सिम्बा हे पात्र साकारलं आहे. मालिकेत प्रेक्षकांना सात वर्षांचा लीप पाहायला मिळाला आणि त्यानंतर साईराजची एन्ट्री झाली होती. त्याचे निरागस हावभाव, दमदार अभिनय यामुळे मालिकेच्या टीआरपीवर देखील सकारात्मक परिणाम झाला. यानंतर त्याच्या लोकप्रियतेतव व प्रसिद्धीमध्ये चांगलीच वाढ झाली आणि आता मालिकेतला सिंबा सर्वांच्या आवडीचा झाला आहे. त्याला भेटण्यासाठी चाहते आतुर असतात. अशातच सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Vajra Production (@vajraprod)

आणखी वाचा – ८५ वर्षीय आजोबांची भक्ती पाहून भारावला सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, विचारपुस करत आशीर्वादही घेतला अन्…; नेटकऱ्यांनीही केलं कौतुक

या व्हायरल व्हिडीओमध्ये सिंबा म्हणजेच साईराज भेटण्यासाठी एक आजी आतुरतेने वाट पाहत आहे. ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेचे कलाकार सध्या प्रेक्षकांची भेट घेत आहेत. याचनिमित्ताने सिंबा व अप्पी म्हणजेच साईराज व शिवानी नाईक यांनी प्रेक्षकांची भेट घेतली. यावेळी भेट घेऊन जात असताना सिंबाच्या गाडीजवळ एक आजी आल्या आणि त्यांनी सिंबाची दृष्ट काढली. “आमच्या घरी ये बाळा… किती छान आहेस बाळा. उमेद दिलीस म्हाताऱ्या माणसाला’…” असं म्हणत त्यांनी सिंबाचे कौतुकही केलं.

आणखी वाचा – नर्गिस फाखरीच्या बहिणीला परदेशात अटक, अभिनेत्रीवर एक्स बॉयफ्रेंड आणि त्याच्या गर्लफ्रेंडची हत्या केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

सिंबा व आजींच्या भेटीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी या व्हिडीओखाली कमेंट्समध्येही सिंबाचे कौतुक केलं आहे. “खूप छान”, “खूपच भारी”, “सिंबाला असंच प्रेम मिळो” अशा अनेक कमेंट्सद्वारे नेटकटऱ्यांनी सिंबा म्हणजेच साईराजचे कौतुक केलं आहे. दरम्यान, मालिकेत सध्या त्याच्या आजारपणाचे कथानक सुरु आहे, त्याला झालेल्या गंभीर आजारावर तो मात करत आहे. मालिकेचे कथानक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.        

Tags: Appi Amchi Collectorsairaj kendreSairaj Kendre video
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Kundali Bhagya Hindi serial fame actress Shraddha Arya give birth to twins she shared a special video on social media

'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्री श्रद्धा आर्याने दिला जुळ्या मुलांना जन्म, रुग्णालयातच केली सजावट, दाखवली संपूर्ण झलक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.