शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शाहरुख खानच्या सहकलाकाराचा घाणेरडा कारभार,महिलेला चुकीचा स्पर्श व अश्लील भाषेत संवाद, पीडितेकडून मोठे खुलासे

Shamal Sawantby Shamal Sawant
नोव्हेंबर 30, 2024 | 4:05 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
sharad kapoor sexual harrasment fir

शाहरुख खानचा सहकलाकार शरद कपूर विरोधात तक्रार दाखल

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा बहूचर्चित चित्रपट ‘जोश’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत राहिला. यामध्ये त्याच्याबरोबर अभिनेत्री ऐश्वर्या रायदेखील दिसून आली होती. ऐश्वर्याने शाहरुखच्या बहिणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील एक अभिनेता हा आता चर्चेत आला आहे. हा अभिनेता म्हणजे  शरद कपूर. इतक्या वर्षांनी त्याचे पुन्हा एकदा नाव समोर आले आहे. शरदच्या विरोधात आता एक गुन्हा दाखल झाला असून महिलेबरोबर दुर्व्यवहार केल्याचे समोर आले आहे. तसेच चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचे आरोपदेखील लावण्यात आले आहेत. शरदविरोधात नक्की कोणते आरोप लावण्यात आले आहेत याबद्दल आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. (sharad kapoor sexual harrasment fir)

मुंबई येथील खार पोलिस स्थानकात असलेल्या रिपोर्टनुसार, एका ३२ वर्षीय महिलेने शरदविरोधात तक्रार दाखल केली आहे. या घटणेबद्दल सांगताना पीडिता म्हणाली की, “शरद यांनी मला घरी बोलावलं होतं. यावेळी त्याने असभ्य वर्तन करण्याचा प्रयत्न केला आणि जबरदस्तीने चुकीच्या पद्धतिने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला”. पीडित महिलेने सांगितले की, “फेसबुकच्या माध्यामातून शरदशी संपर्क झाला होता. त्यानंतर व्हिडीओ कॉलवर संपर्क साधला”.

आणखी वाचा – हिरवा चेहरा, टक्कल, भयानक अवतार अन्…; नीना गुप्ता यांचा लूक पाहून सगळेच हैराण, ओळखणंही कठीण, म्हणाल्या, “चुडैल…”

View this post on Instagram

A post shared by Sharad Kapoor (@the_sharadkapoor)

पुढे पीडितेने सांगितलं की, “शरदने चित्रीकरणाच्या निमित्ताने बोलायचे आहे असे सांगून भेटण्यास सांगितले. नंतर त्याने स्वतःचे लोकेशन शेअर केले आणि खार येथील ऑफिसमध्ये येण्यास सांगितले. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे ऑफिस नसून त्याचे घर असल्याचे समजले. मी जेव्हा त्याच्या घरी पोहोचले तेव्हा एका व्यक्तीने दरवाजा उघडला. त्यावेळी शरदने बेडरुममधून आवाज देत आत येण्यास सांगितले. त्यावेळी चुकीचा स्पर्शदेखील केला. नंतर त्याच संध्याकाळी शरदने पीडित महिलेला मेसेज पाठवला आणि चुकीच्या शब्दांचा वापर केला”.  

आणखी वाचा – “चांगल्यासाठीच नातं संपलं अन्…”, आमिर खानच्या घटस्फोटावर लेकीचं धक्कादायक वक्तव्य, म्हणाली, “एकमेकांवर प्रेम पण…”

ही सर्व घटना पीडितेने तिच्या मैत्रिणीला सांगितली. तिने जवळच्या पोलिस स्थानकात जाऊन अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल केली. या घटणेबद्दल अभिनेत्याने अद्याप कोणतेही वक्तव्य केले नाही. शरदच्या विरोधात भारतीय कलम ७४, कलम ७५ व कलम ७९ लावण्यात आले आहेत. त्यामुळे आता अभिनेत्याविरोधात कोणती कारवाई केली जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Tags: joshshahrukh knanshard kapoor
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
prasad jawade birthday celebration

अमृता देशमुखने नवऱ्याच्या वाढदिवसाचं केलं ढिचँक सेलिब्रेशन, शेअर केले सगळ्यात गोड फोटो, म्हणाली, "रहना तू, है जैसा तू…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.