अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सकपाळ यांनी समाजातील अन्यायग्रस्त स्त्रियांना आशेचा प्रकाश दाखवला. अनाथ लेकरांच्या आईची चरित्रगाथा आता लवकरच आपल्याला छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. आज सिंधुताई सकपाळ आपल्यात नसल्या तरी त्यांच्या कार्याची महती अगणित आहे हे विसरून चालायचं नाही. काही दिवसांपूर्वीच कलर्स मराठी वाहिनीने सिंधुताई माझी आई या नव्या मालिकेच्या प्रोमोची एक झलक सोशल मीडियावरून पोस्ट देखील केली होती.(Priya Berde New Serial)
तेव्हापासून या मालिकेची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली होती. आता लवकरच प्रेक्षकांच्या या उत्सुकतेला पूर्णविराम मिळणार आहे, कारण कलर्स मराठी वाहिनीच्या पेजवरून या मालिकेला अनुसरून एक पोस्ट देखील करण्यात आली आहे. अखेर प्रतीक्षा संपणार, अनाथ लेकरांची आई आपल्या भेटीला येणार असं कॅप्शन या पोस्टला देण्यात आलं असून या मालिकेची सुरवात कधी होणार हे समोर येणार आहे.
दरम्यान या मालिकेत आपल्याला अभिनेत्री प्रिया बेर्डे भूमिका साकारणार असल्याचं समोर आलं आहे. नुकत्याच इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत प्रिया बेर्डे यांनी आगामी मालिका सिंधुताई माझी आई मध्ये दिसणार असल्याचं सांगितलं आहे. चला तर पाहूया प्रिया बेर्डे नेमक्या काय म्हणाल्या आहेत. प्रिया बेर्डे म्हणाल्या,आता माझी लवकरच नवी मालिका सुरु होणार आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील सिंधुताई सकपाळ. (Priya Berde New Serial)
तर आता या मालिकेत सिंधुताई सकपाळ यांच्या भूमिकेत प्रिया बेर्डे दिसणार का? नेमकी कोणती भूमिका प्रिया बेर्डे साकारणार हे पाहणं आता उत्सुकतेचं असणार आहे.
