शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

हिरवा चुडा, फुलांचे दागिने अन्…; रेश्मा शिंदेच्या दाक्षिणात्य लूकला मराठमोळा टच, हळदी स्पेशल फोटो समोर

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 29, 2024 | 11:18 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi actress Reshma Shinde special southern style look for Haldi and her photos and videos are viral on social media.

रेश्मा शिंदेने हळदीसाठी खास दाक्षिणात्य पद्धतीचा लूक, फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

गेल्या काही दिवसांपासून मराठी अभिनेत्री रेश्मा शिंदेच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेच्या टीमने रेश्माचं पहिलं केळवण केलं होतं. यानंतर अभिज्ञा भावे आणि अनुजा साठे या दोघींनी रेश्माचं दुसरं केळवण साजरं केलं होतं. सोशल मीडियावर तिच्या केळवणाची चर्चा सुरु असतानाच बुधवारी रात्री अभिनेत्री मेहंदीचे फोटो शेअर करत सर्वांना सुखद धक्का दिला. तेव्हापासून तिच्या लग्नाची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. अशातच नुकताच रेश्माचा हळदी सोहळा पार पडला आणि या हळदी सोहळ्याचे काही खास फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (Reshma Shinde Haldi Look)

रेश्मा आणि तिच्या नवऱ्याने हळदी समारंभासाठी खास ट्विनिंग केल्याचं पाहायला मिळालं. अभिनेत्रीने हळदीसाठी खास दाक्षिणात्य पद्धतीचा लूक केला होता. हळदी रंगाचा लेहेंगा, त्यावर हिरवा पदर, पिवळा ब्लाऊज, फुलांचे दागिने आणि मोकळे केस असा खास लूक अभिनेत्रीने हळदी सोहळ्यासाठी केला होता. या हळदी स्पेशल लूकमध्ये अभिनेत्री रेश्मा शिंदे खूपच सुंदर दिसत होती. तर, तिच्या होणाऱ्या नवऱ्यानेही तिच्या हळदी लूकलं साजेसा असा पिवळ्या रंगाचा कुर्ता घातला होता. दोघेही या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – Video : “गळ्यातील मंगळसूत्र…”, ‘सारं काही तिच्यासाठी’ फेम अभिनेत्याच्या पत्नीने घेतला खास उखाणा, सुंदर व्हिडीओ व्हायरल

रेश्माला हळद लागल्याचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. केळवण सुरू झाल्यापासून अभिनेत्रीने तिचा होणारा नवरा नेमका कोण आहे? याबाबत कोणतीही माहिती उघड केली नव्हती. मात्र, नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रेश्माच्या होणाऱ्या नवऱ्याची झलक स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी रेश्मा शिंदे आता तिच्या आयुष्यातील एका नवीन प्रवासाला सुरुवात करणार आहे.

आणखी वाचा – सोनाक्षी-झहीर यांच्या लग्नावर आई पूनम सिन्हा अजूनही नाराज?, ‘त्या’ व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

दरम्यान, रेश्माच्या मेहंदीमध्ये लग्नाची तारीख स्पष्टपणे दिसली. यावरुन २९ नोव्हेंबरला अभिनेत्री लग्न करणार असल्याचं समोर आलं. त्यामुळे रेश्मा आज लग्नबंधनात अडकणार आहे. तिच्या घरी लग्नाआधीच्या विधींनी सुरुवात झाली. रेश्माला नुकतीच हळद लागली असून अभिनेत्री आता विवाहबंधनात अडकणार आहे. त्यामुळे तिच्या लग्नाची सध्या चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.

Tags: reshma shindereshma shinde haldireshma shinde husband
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Vishakha Subhedar Son Reaction

आईच्या अभिनयाचं लेकाकडून कौतुक, पोस्ट शेअर करत विशाखा सुभेदार भावुक, म्हणाल्या, "त्याच्याकडून ही शाबासकी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.