Reshma Shinde Haladi : कलाविश्वात अनेक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. सोशल मीडियावर या कलाकारांच्या लग्नाचे फोटो तुफान व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत. अशातच रंग माझा वेगळा फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. थेट केळवणाचे फोटो शेअर करत तिने लग्नबंधनात अडकणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांसह शेअर केली आहे. मात्र यावेळी अभिनेत्रीने तिचं लग्न कोणाबरोबर होणार हे सांगितलं नव्हतं. यामुळे रेश्माचा नवरा नेमका कोण आहे याची साऱ्यांनाच उत्सुकता लागून राहिली होती. आता प्रेक्षकांच्या या उत्सुकतेला पूर्णविराम मिळणार आहे. कारण अभिनेत्रीच्या नवऱ्याची पहिली झलक समोर आली आहे.
रेश्माच्या नवऱ्याची पहिली झलक समोर आली असून त्याचं नावंही समोर आलं आहे. नुकतेच रेश्माच्या हळदी समारंभाचे फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये नवरी मुलगी हळदी साठी खास लूकमध्ये पाहायला मिळतेय. इतकंच नाही तर समोर आलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीच्या नवऱ्याची झलकही समोर आली आहे. रेश्माने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने तिच्या नवऱ्याला ही पोस्ट टॅग केली असल्याचं दिसतंय. रेश्माच्या नवऱ्याचं नावं पवन असे आहे.
अभिनेत्रीच्या हळदी समारंभाचे फोटो व व्हिडीओदेखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या हळदी सोहळ्यासाठी रेश्माने खास हिरव्या रंगाची साडी परिधान केली असून त्यावर पिवळ्या रंगाचा ब्लाउजही परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. तिचा साऊथ इंडियन लूक खूप खास असल्याचं पाहायला मिळालं. तसंच हातामध्ये रेश्माने खास फ्लोरल ज्वेलरीही घातली आहे.
आणखी वाचा – रेश्मा शिंदेच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, होणाऱ्या नवऱ्याची नावाची लागली हळद, व्हिडीओ व्हायरल
रेश्माचे सौंदर्य या हळदीच्या लूकमध्ये आणखीनच खुलून आले आहे. रेश्माच्या मेहंदी समारंभातील तिचे पारंपरिक अंदाजातील फोटोही अनेकांच्या पसंतीस पडले. मेहंदीनंतर अभिनेत्रीच्या हळदीचे फोटोही समोर आले. गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्रीच्या लग्नाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती आणि अखेर अभिनेत्री आता विवाहबंधनात अडकणार आहे. तिच्या लग्नाची सध्या चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.