Tharla Tar Mag Serial Update : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या सायली व अर्जुन यांच्यातील प्रेम बहरताना दिसत आहे. मालिकेत सध्या अर्जुनचे सायलीसमोर प्रेम व्यक्त करण्याबाबतचे प्रयत्न सुरु आहेत. मालिका सुरु झाल्यापासून सायली व अर्जुन यांच्यात प्रेम केव्हा होणार, ही जोडी एकत्र केव्हा येणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. मालिका सुरु झाल्यापासून तब्बल दोन वर्षांनी हा क्षण येणार असल्याने सगळेच प्रेक्षक याची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच मालिकेच्या प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या प्रोमोमध्ये सायली व अर्जुन एकमेकांसमोर प्रेमाची कबुली देण्यास सज्ज झाले आहेत. हा प्रोमो पाहून साऱ्यांची उत्सुकता वाढून राहिली आहे.
‘स्टार प्रवाह’ वाहिनीने शेअर केलेल्या या प्रोमोमध्ये सायली व अर्जुनची रोमँटिक डेट पाहायला मिळतेय. एका रेस्टॉरंटच्या रोमँटिक माहोलमध्ये अर्जुन सायलीला प्रपोज करणार असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रोमोमध्ये अर्जुनची एन्ट्री होते. सायली रेस्टॉरंटच्या टेबलवर अर्जुनची वाट पाहत बसलेली असते.दोघेही एकमेकांसमोर येताच पाहत राहतात. आणि अर्जुन सायलीला म्हणतो, “मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे”. यादरम्यान, अर्जुन त्याच्या खिशातून अंगठी सुद्धा आणतो. तो म्हणतो, “आय…” आणि इथेच प्रोमो संपतो. या प्रोमोच्या शूटिंगचा व्हिडीओ जुईने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
जुईने या व्हिडीओला, “टीमवर्कने सगळ्या गोष्टी साध्य होतात. बहुप्रतिक्षीत प्रोमोचा BTS खास तुमच्यासाठी” असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओमध्ये जुईने मालिकेच्या टीमवर्कच कौतुक केलं आहे. हा प्रोमो पाहून नेटकरीही व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. प्रोमो पाहून नेटकरी असं म्हणताना दिसत आहेत की, “जर का dream sequence निघाला तर मग काही खरं नाही”, “खूप वाट बघतोय आम्ही की कधी सायली अर्जुन एकमेकांना प्रेम व्यक्त करतील. कधी समजेल त्यांना की ते दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करतात. बस खूप झाले आता स्वप्नातले सीन आता खरोखर हे सीन दाखवा. आम्ही सर्व प्रेक्षक खूप आतुरतेने वाट बघत आहोत. सायली अर्जूनची लव्हस्टोरी”.
तर काहींनी असं म्हटलं आहे की, “मी खूप उत्सुक आहे. सायली व अर्जुन त्यांच्या मनातील केव्हा बोलणार याची वाट बघतेय”, “जुई ताई खरच मानलं पाहिजे तुम्हा सर्व कलाकारांना इतक्या गोंगाटात सुद्धा किती शांत, सहजपणे आपली भूमिका निभावत आहेस. एका एका सीन पाठीमागे तुम्हा कलाकार आणि पडद्यापाठीमागच्या माणसांची किती मेहनत असते. हे या सोशल मीडियामुळे व्हिडीओच्या माध्यमातून सर्वांसमोर येत आहे. खूप कौतुक वाटलं”.