गुरूवार, जून 5, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मलायका अरोराबरोबरच्या ब्रेकअपनंतर अर्जुन कपूरने एक्स गर्लफ्रेंडला केला मेसेज, म्हणाला, “हो, मी…”

Shamal Sawantby Shamal Sawant
नोव्हेंबर 27, 2024 | 4:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
arjun kapoor on ex-girlfriend

अर्जुन कपूरचे एक्स गर्लफ्रेंड बद्दल भाष्य

सध्या बॉलिवूडमधील अभिनेता अर्जुन कपूर व अभिनेत्री मलायका अरोरा ही  जोडी अधिक चर्चेत राहिली आहे. गेले सहा वर्ष अर्जुन व मलायका हे दोघंही एकमेकांना डेट करत होते. दोघंही लग्नबंधनात अडकतील अशा चर्चादेखील मोठ्या प्रमाणात सुरु होत्या. मात्र काही महिन्यांपूर्वी दोघांचाही ब्रेकअप झाल्याचे समोर आले. यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. ‘सिंघम अगेन’ चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी अर्जुनने सर्वांच्या समोर सिंगल असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. आता अर्जुनबद्दलची एक नवीन अपडेट समोर आली आहे. त्यामुळे आता यावरुन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. (arjun kapoor on ex-girlfriend)

अर्जुनने नुकतीच ‘मॅशबेल इंडिया’ला मुलाखत दिली. यावेळी त्याला विचारले की, “कधी गर्लफ्रेंडला रात्री ३ वाजता मेसेज केला आहे का?” त्यावर अर्जुनने उलट प्रश्न केला की, “हा प्रश्न मला नीट समजावून सांगाल का?”, त्यावर त्याला पुन्हा विचारण्यात आले की, “कधी तुम्ही तुमच्या एक्स गर्लफ्रेंडला उशिरा रात्री मेसेज केला आहे का?”, त्यानंतर अर्जुनने उत्तर दिले की, “हो मी असं केलं आहे”.

आणखी वाचा – Tharla Tar Mag : सायली-अर्जुनचं नातं बहरणार, एकमेकांसमोर देणार का प्रेमाची कबुली?, प्रोमोने वाढवली उत्सुकता

View this post on Instagram

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

पुढे तो म्हणाला की, “इथे कोण आहे जो खोटं बोलतो की कधीही उशिरा रात्री मेसेज केला नाही असं?, दरम्यान आता अर्जुनच्या या वक्तव्यावरुन मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली आहे. ‘सिंघम अगेन’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्याच्या रिलेशनशिपबद्दल भाष्य केले होते. मुंबई येथील शिवाजी पार्कमध्ये आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीमध्ये तो म्हणाला होता की, “मी आता सिंगल आहे, रिलॅक्स”. तसेच मलायकाच्याच्या वडिलांच्या निधनानंतर अर्जुन मलायका व तिच्या कुटुंबाला धीर देताना दिसला होता.

आणखी वाचा – Paaru Marathi Serial : अहिल्यादेवींनी आदित्यसाठी अनुष्काला घातली मागणी, होकार देणार का?, पारूचं काय होणार?

अर्जुन व मलायकाने २०१८ साली एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. २०१९ साली त्यांनी सोशल मीडियावर त्यांचं नातंदेखील स्वीकारलं होतं. दोघं अनेकदा पार्टीमध्ये, डिनरला, आऊटिंगदरम्यान दिसून यायचे. मात्र गेल्या काही काळापासून त्यांनी एकमेकांना भेटणं, एकमेकांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देणं हे सगळं बंद केलं.  

Tags: arjun kapoorex girlfriendmessage
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Chahat Khanna Personal life
Entertainment

आजारी असतानाही शरीरसंबंध ठेवायचा आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जून 4, 2025 | 6:00 pm
Nivedita saraf talk about ashok saraf
Entertainment

“इतरांप्रमाणे दुसऱ्यांचे डायलॉग न कापता…”, पत्नी निवेदितांकडून अशोक सराफांचं तोंडभरुन कौतुक, म्हणाल्या, “दुसऱ्याला बरोबर घेऊन…”

जून 4, 2025 | 5:48 pm
Dipika Kakar Health
Entertainment

दीपिका कक्करची कॅन्सरवर मात, १४ तास सुरु होती शस्त्रक्रिया, नवऱ्याने दिली अपडेट, म्हणाला, “आता आयसीयूमध्ये…”

जून 4, 2025 | 4:24 pm
Jaya bachchan angry on paparazzi
Entertainment

Video : “निघा इथून, सगळेच घाणेरडे”, फोटोग्राफर्सवर अचानकच भडकल्या जया बच्चन, गाडीमध्ये बसूनही ओरडत राहिल्या अन्…

जून 4, 2025 | 3:29 pm
Next Post
Shatrughan Sinha

"बिहारी रस्त्यावरचा गुंड…", शत्रुघ्न सिन्हाच्या सासूबाईंचा लग्नाला होता विरोध, म्हणाल्या होत्या, "फिल्म इंडस्ट्रीतील…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.