महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो आहे.आणि या शोचं यश नक्कीच संपूर्ण टीमच आहे.पंरतु कलाकारांनी या शोला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे.आणि म्हणूनच महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोच्या माध्यमातून अनेक कलाकार घरोघरी पोहोचले, प्रेक्षकांचे लाडके झाले.या शो ची प्रेक्षकांना इतकी सवय झाली आहे की, सध्या शो सुरु नाही आहे तर प्रेक्षक शोला आणि कलाकारांच्या निखळ विनोदाला मिस करत आहेत.(Shivali Parab Troll)
अशीच या शो मुळे नावारूपाला आलेली सगळ्यांची लाडकी, चुलबुली अभिनेत्री म्हणजे शिवाली परब.शिवालीचा नटखट अंदाज कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस पडतो. शिवालीची मोना डार्लिंग, शिवाली अवली कोहली या पात्रांना तर विशेष प्रेम मिळालं.त्याचसोबत शिवाली अनेक प्रकारचे फोटोशूट करत असते, त्यामुळे देखील ती विशेष चर्चेत असते.सध्या असेच ग्रे रंगाच्या ड्रेस वरचे काही फोटोज Create Your Own Moonshine असं कॅप्शन देत शिवालीने शेअर केले आहेत.अभिनेता अपूर्व रांजणकर, ओंकार राऊत यांच्यासोबतच प्रेक्षकांनी देखील शिवालीच्या या लूकचं कमेंट्स करून कौतुक केलं आहे.
पाहा का होतेय शिवाली ट्रोल? (Shivali Parab Troll)
पंरतु अनेक कलाकारांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागत.शिवाली देखील तिच्या ग्रे ड्रेसवरच्या फोटोजवर, साधी सिम्पल छान दिसतेस त्यामुळे तुला फॉलो केलेलं, आता हे असलं बघून अनफॉलो,जेवढा पैसा,प्रसिद्धी जास्त तेवढे कपडे कमी होतात का? अशा कमेंट्स मधून ट्रोल होताना दिसत आहे.(Shivali Parab Troll)

.परंतु कपड्यांवरून प्रेक्षक कलाकार चांगला का वाईट हे ठरवणार का? असं चित्र दिसतं आहे. कलाकार म्हणून वावरत असताना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांनी कसे कपडे घालावे याचं स्वातंत्र्य नक्कीच कलाकरांना आहे.अभिनेत्रीने तोकडे कपडे घातले तर कलाकार म्हणून तिच्या वरचं प्रेम कमी होत का? शिवालीच्या या कपड्यांमध्ये खटकण्यासारखं आणि ट्रोल करण्यासारखं नेमकं काय आहे? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.