रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुला चित्रपटासाठी विचारणा होते का?”, चाहत्याचा जुई गडकरीला प्रश्न, अभिनेत्रीनेही दिलं थेट उत्तर, म्हणाली, “हवं तसं काम…”

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 24, 2024 | 4:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Tharala Tar Mag fame Marathi actress Jui Gadkari answered the question of a fan that Did you ask for a movie

अप्पी आमची कलेक्टर मालिकेतील अमोलच्या आजारपण तिसऱ्या स्टेजला, प्रेक्षकांनी या कथानकावर व्यक्त केली नाराजी

मराठी मालिकाविश्वाचा लाडका चेहरा आणि गुणी अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. अनेक मालिकांमध्ये काम करून जुईने कलाविश्वात आणि प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं. ‘पुढचं पाऊल’ या मालिकेमधून जुईला लोकप्रियता मिळाली. ‘पुढचं पाऊल’ मालिकेद्वारे तिने मनोरंजन क्षेत्रात तिचं पहिलं पाऊल टाकलं. यानंतर अभिनेत्रीची या क्षेत्रातील घोडदौडही अजूनही चालूच आहे. सध्या ती स्टार प्रवाहवरीलच ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत ती सायली हे पात्र साकारत असून तिची ही भूमिका अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.  (Jui Gadkari on Fan Question)

जुईचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. जुई अनेकदा तिचे फोटो शेअर करताना दिसते. तसंच नवीन प्रोजेक्टबाबतही ती चाहत्यांना पोस्टद्वारे अपडेट देत असते. सेटवरची धमाल, ‘ठरलं तर मग’ मालिकेचे प्रोमो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच अभिनेत्रीने नुकतंच इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी सेशन’ घेऊन चाहत्यांशी गप्पा मारल्या. यावेळी जुईच्या अनेक चाहत्यांनी जुईला तिच्या संबंधित काही प्रश्न विचारले.

आणखी वाचा – विधानसभा निवडणुकीच्या निकालावर सुप्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत, राज ठाकरेंचा फोटो शेअर करत म्हणाली, “आमचा राजा नाही, महाराष्ट्र…”

यावेळी एका चाहत्यांनी जुईला प्रश्न करत असं विचारलं की, “ताई तुला चित्रपटासाठी विचारणा होते का? आणि होत असेल तर स्वीकारत का नाही?” यावर जुईने चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देत असं म्हटलं की, “विचारणा होते! पण मला हवं तसं काम नाही मिळत! म्हणुन ‘चांगल्या’ कामाची वाट बघत आहे”. या प्रश्नाबरोबरच चाहत्यांनी तिला तिच्या शिक्षणाबद्दल, लग्नाबद्दही काही प्रश्न विचारले. ज्याची जुईने अगदी खास उत्तरे दिली.

आणखी वाचा – The Great Indian Kapil Show मध्ये आठ वर्षांनी गोविंदा व कृष्णा अभिषेक पुन्हा एकत्र, अखेर कौटुंबिक वाद मिटले?

दरम्यान, ‘पुढचं पाऊल’ नंतर जुई अनेक मालिकांमध्ये दिसली होती. ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘वर्तुळ’, ‘सरस्वती’ या मालिकांमध्ये ती झळकली. ‘बिग बॉस मराठी’मध्येही जुई सहभागी झाली होती. त्यामुळे आजवर अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये झळकणारी जुई गडकरी आता मोठ्या पडद्यावर चित्रपटांमधून कधी पाहायला मिळणार? याची चाहते वाट पाहत आहेत.   

Tags: Jui Gadkari Fan Question AnswerJui Gadkari on Fan QuestionTharala Tar Mag fame actress Jui Gadkari
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Singer A. R. After Rahmans name linked with Mohini dey wife Saira Banu expressed her reaction.

घटस्फोटाच्या घोषणेनंतरही पत्नीचे ए. आर. रहमानवर प्रेम कायम, बदनामी करणाऱ्यांना ठणकावत म्हणाली, "आतापर्यंत गप्प होती पण..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.