शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध गायिका नेहा भसीनला गंभीर आजार, तब्बल १० किलो वजन वाढलं, त्रासामुळे रडू लागली अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 23, 2024 | 2:51 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Neha Bhasin Share Emotional Post

सुप्रसिद्ध गायिका नेहा भसीनला गंभीर आजार, तब्बल १० किलो वजन वाढलं

Neha Bhasin Share Emotional Post : चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय गायिका आणि ‘बिग बॉस ओटीटी’ची माजी स्पर्धक नेहा भसीन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. खरं तर, यावेळी ती तिच्या नखरेल लूकमुळे नाही तर तिच्या गंभीर आजारामुळे चर्चेत आली आहे. नुकतेच नेहाने उघड केले आहे की, ती प्रीमेन्स्ट्रुअल डिसफोरिक डिसऑर्डर (PMDD) या आजाराने त्रस्त आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी याबाबत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. वास्तविक, नेहा भसीनने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे वाईट दिवस आठवत एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. या नोटमध्ये तिने तिच्या तब्येतीशी संबंधित गोष्टीही चाहत्यांसह शेअर केल्या आहेत.

नेहाने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, जेव्हा ती किशोरवयात होती तेव्हा ती प्रीमेन्स्ट्रुअल डिसफोरिक डिसऑर्डर (PMDD) या आजाराचा संघर्ष करत होती. त्यानंतर २०२२ हे वर्षही तिच्यासाठी वाईट ठरले. जेव्हा तिला समजले की, तिच्यामध्ये प्रोजेस्टेरॉनची कमतरता आहे. हा एक अतिशय वाईट आजार आहे. यामुळे त्यांना दर १५ दिवसांनी येथे उठणे, बसणे आणि जगणे कठीण होऊन बसले आहे.

आणखी वाचा – “पौर्णिमेचा चंद्र सौम्य असला तरी…”, देवेंद्र फडणवीसांच्या विजयानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, “सूर्य पुन्हा एकदा…”

View this post on Instagram

A post shared by Neha Bhasin (NB) (@nehabhasin4u)

नेहा भसीननेही या पोस्टमध्ये बॉडी शेमिंग आणि ट्रोलिंगबद्दल भाष्य केलं. आजकाल सगळ्याच अभिनेत्री या ट्रोलिंगची शिकार झालेल्या पाहायला मिळाल्या आहेत. अशातच नेहानेही सोशल मीडियावर लोकांनी त्याला ट्रोल केल्याचे सांगितले. गायिकेने असे लिहिले की, तिच्या वाढलेल्या वजनाबाबत लोकांकडून त्याच्यावर बरीच टीका झाली आहे. पण आता तिने त्याकडे लक्ष देणे बंद केले. आता ती पुशअप्स आणि वर्कआउट्सच्या माध्यमातून वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, सध्या तिच्या शरीरावर कोणताही परिणाम होत नाही.

आणखी वाचा – आजारपणात अमोलला करावं लागलं टक्कल, प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकही भावुक, अप्पी-अर्जुनसाठीही कठीण काळ

नेहाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “माझ्यावर अनेक वर्षांपासून उपचार सुरु आहेत, पण तरीही या आजाराने माझा जीव घेतला आहे. आता मी स्वतःला हरवत आहे. मी २०२२ पासून औषधांवर आहे. हा आजार औषधाशिवाय बरा व्हावा यासाठी मी प्रयत्नही केले आहेत पण तसं झालं नाही”.

Tags: bollywood newsneha bhasinNeha Bhasin Share Emotional Post
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
CID new promo

CID Promo : नव्या स्टाइलमध्ये दयाने तोडला दरवाजा, 'सीआयडी'च्या नव्या प्रोमोमध्ये दिसला रॉकिंग अंदाज, कधी सुरु होणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.