रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ट्रेनमध्ये आरामात झोपून मलायका अरोराचा प्रवास, चेहरा पाहून ओळखणंही कठीण, फोटो व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 21, 2024 | 4:51 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Malaika Arora Traveled Post

ट्रेनमध्ये आरामात झोपून मलायका अरोराचा प्रवास, चेहरा पाहून ओळखणंही कठीण, फोटो व्हायरल

Malaika Arora Traveled Post : अभिनेत्री मलायका अरोरा ही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ही अभिनेत्री चित्रपटांमधून दिसत नसली तरीही ती नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते. विशेषतः अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यातील कारणामुळे चर्चेत राहिलेली पाहायला मिळते. तिच्या व अर्जुन कपूरच्या नात्याची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळते. अशातच बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोराने गुरुवारी तिच्या चाहत्यांना एक फोटो पोस्ट करत आश्चर्यचकित केले. यावेळी अभिनेत्रीने भारतीय रेल्वेमधील स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. अभिनेत्रीचा हा रेल्वेमधील फोटो सध्या चर्चेत आलेला पाहायला मिळत आहे.

समोर आलेल्या फोटोमध्ये मलायका पायजमा घालून सीटवर झोपली आहे आणि तोंडावर मास्क लावून फोन वापरताना दिसत आहे. या व्हायरल फोटोमध्ये मलायका अरोराच्या सीटच्या शेजारी टेबलवर टिफिन व टिश्यू बॉक्स ठेवलेला दिसत आहे. अभिनेत्रीने यावेळी रेल्वेने दिलेली बेडशीट, उशा आणि ब्लँकेटचा वापर केला आहे. इतकंच नव्हे तर प्रवाशादरम्यान ती आरामात वेळ घालवताना दिसत आहे. यावेळी ती त्वचेचीही विशेष काळजी घेताना दिसत आहे. अभिनेत्रीने हा फोटो शेअर करत असं म्हटलं की, “याला अधिक सुंदर करा”.

आणखी वाचा – ए आर रहमान यांच्याकडे आहे कोट्यवधींची संपत्ती, घटस्फोटानंतर बायकोला मिळणार इतके पैसे कारण…

अर्जुन कपूरपासून ब्रेकअप झाल्याची पुष्टी झाल्यानंतर, ५१ वर्षीय मलायका नोव्हेंबरमध्ये आव्हानांना तोंड देत आहे. नोव्हेंबरच्या चॅलेंजमध्ये ती नऊ गोष्टी करणार आहे. “दारू पिऊ नका”, “आठ तासांची झोप घ्या”, “एक मार्गदर्शक तयार करा”, “दररोज व्यायाम करा”, “दररोज दहा हजार पावले चाला”, “दररोज सकाळी १० वाजेपर्यंत उपवास करा”, “प्रक्रिया केलेले अन्न टाळा”, “रात्री आठ नंतर काहीही खाऊ नका”, “विषारी लोकांपासून दूर राहा”, या गोष्टींचं ती पालन करणार आहे.

आणखी वाचा – Navri Mile Hitlerla : रेवतीबरोबर लग्न करण्यास यशचा नकार, एजेंच्या विरोधात जाऊन लीला नातं जुळवणार का?

मलायका व अर्जुनने २०१६ पासून एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. काही दिवसांपूर्वी ‘सिंघम अगेन’शी संबंधित एका कार्यक्रमादरम्यान अर्जुनने मलायकाबरोबरच्या ब्रेकअपची पुष्टी केली. यापूर्वी मलायकाचा अरबाज खानपासून घटस्फोट झाला होता. त्यांना एक मुलगा आहे, त्याचे नाव अरहान असे आहे.

Tags: bollywood actressmalaika aroraMalaika Arora Traveled Post
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Appi Amchi Collector Marathi serial update new promo Amol will undergo chemotherapy to treat his illness

अमोल गंभीर आजाराशी कसा करणार सामना?, अर्जुनने खूश करण्यासाठी दिलं खास गिफ्ट, त्यात अप्पीचाही फोटो अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.