रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Navri Mile Hitlerla : रेवतीबरोबर लग्न करण्यास यशचा नकार, एजेंच्या विरोधात जाऊन लीला नातं जुळवणार का?

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 21, 2024 | 1:23 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Navri Mile Hitlerla Serial Updates Yash and Revathi refuse to get married so leela Will try to maintain their relationship.

नवरी मिळे हिटलरला मालिकेत यश व रेवतीकडून लग्न करण्यास नकार, लीला दोघांचे नाते टिकवणार का?

Navri Mile Hitlerla Serial : ‘नवरी मिळे हिटलरला’ ही झी मराठीवरील मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. कधी एजे-लीला यांच्यामधील मैत्री, कधी त्यांच्यात निर्माण होणारे गैरसमज, तर संकटात एजेने लीलाला केलेली मदत अशा कथानकामुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका होताना दिसत आहे. अशातच मालिकेत नुकताच एक नवीन ट्विस्ट आला तो म्हणजे यशच्या लग्नाचा. लीलाने रेवतीला तिचे लग्न यशबरोबर लावून देणार असल्याचे वचन दिलं आहे. पण एजेंच्या मनात काही वेगळंच आहे. श्वेताचे एजेंबरोबर लग्न ठरले होते, पण काही कारणांमुळे लीलाचे लग्न एजेंबरोबर होते. त्यामुळे आता एजे श्वेताबरोबर यशचे लग्न लावणार आहे. (Navri Mile Hitlerla Serial Updates)

यश व रेवती यांचे लग्न होणार असल्याचे वचन लीलाने रेवती व तिच्या आईला दिलं आहे. त्यानुसार जेव्हा एजे यश व रेवतीच्या लग्नाबद्दल सर्वांना सांगतात तेव्हा लीलाला यशने खरं काय ते सांगावं असं वाटतं. यश व रेवती यांच्या लग्नामुळे लीला एजेंच्या विरोधात जाणार आहे असं दिसत आहे. लीला यश व श्वेता यांच्या साखरपुड्याची तयारी करायला सांगत आहेत. नुकत्याच झालेल्या भागात लीलाने “यश आणि श्वेता यांचा साखरपुडा तुम्ही कसा करता हेच मी बघते” असं म्हणाली. यावर एजे तिला “काहीही करुन हा साखरपुडा होणारच” असं सांगतात. यावर लीलाला एजेंना आव्हान देते आणि म्हणते की, “मी पण तुम्हाला चॅलेंज देते की, काहीही झालं तरी तुम्ही यश व रेवतीचं नातं तोडू शकणार नाही”.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – लेकीच्या वाढदिवसालाही अभिषेक बच्चन नाहीच, ऐश्वर्या रायने एकटीने केलं सेलिब्रेशन, कौटुंबिक वाद आणखीनच वाढला

अशातच आता यात नवीन ट्विस्ट आला आहे तो म्हणजे यश व रेवती दोघांनी त्यांचं प्रेम नाकारलं आहे, दोघांनी माघार घेतली आहे. मलिकेच्या या नवीन प्रोमोमध्ये लीला एजेंना म्हणते की, “तुम्ही त्या दोघांशी बोललात का? त्यांनी तुमचं प्रेम कबूल केलं का? मी सांगत होते त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे”. यावर एज त्यांना लीलाला असं म्हणतात की, “माझं दोघांशी बोलून झालं आहे. त्यांचं एकमेकांवर प्रेम नाही. ते फक्त चांगले मित्र आहेत” आणि हे ऐकून लीला धक्काच बसतो.

आणखी वाचा – “वर्षाताई अ‍ॅक्टिंग करतात”, पॅडी कांबळेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर वर्षा उसगांवकरांचे थेट उत्तर, म्हणाल्या, “मग तू काय करतोस?”

त्यानंतर लीला यशला याबद्दल विचारते तर यश तिला असं म्हणतो की, “माझा निर्णय झाला आहे. मी श्वेताबरोबर लग्न करायला तयार आहे आणि हा माझा अंतिम निर्णय आहे”. त्यानंतर लीला रेवतीलाही फोन करुन विचारते. तेव्हा रेवतीही तिला असं म्हणते की, “यश आणि श्वेताचे लग्न झाले तर मला काहीच प्रॉब्लेम नाही”. त्यामुळे आता यश व रेवती दोघे खोटं का बोलत आहेत? त्यांनी एजेंना खोटं का सांगितलं? हे लीला शोधून काढणार आहे. त्यामुळे लीला रेवती-यशचं तुटणारं नातं वाचवू शकेल का? हे आगामी भागांमधून पाहायला मिळणार आहे.  

Tags: Navri Mile Hitlerla Marathi SerialNavri Mile Hitlerla Marathi Serial UpdatesNavri Mile Hitlerla Serial Updates
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
a r rahman divorce

२८ वर्षांच्या 'त्या' मुलीमुळे ए आर रहमान व त्यांच्या पत्नीमध्ये वादाची ठिणगी?, वकीलानेच सांगितलं सत्य, म्हणाले, "हा निर्णय…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.