शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘Bigg Boss…’ फेम डीपीने घेतली नवीन कार, व्हिडीओद्वारे दाखवली झलक, म्हणाला, “फक्त वडिलांना…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 21, 2024 | 11:36 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Dhananjay Powar New Car 

'Bigg Boss…' फेम डीपीने घेतली नवीन कार, व्हिडीओद्वारे दाखवली झलक

Dhananjay Powar New Car  : ‘बिग बॉस मराठी’ मुळे विशेष चर्चेत असलेला स्पर्धक म्हणजे कोल्हापूरचा धनंजय पोवार. ‘बिग बॉस’च्या घरात असताना डीपी त्याच्या विनोदी बुद्धीमुळे विशेष चर्चेत आला. आणि ‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्यानंतरही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची हवा असलेली पाहायला मिळाली. लोकांनी दिलेल्या प्रेमामुळे डीपी ‘बिग बॉस’च्या अंतिम फेरीत टॉप-४ पर्यंत पोहोचला. डीपीने त्याच्या स्वभावाने आणि खेळाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. डीपी त्याच्या व्हिडीओमुळे नेहमीच चर्चेत असतो. अशातच डीपीने त्याच्या चाहत्यांसह एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. डीपीने नवी कोरी कार घेतली असल्याचं समोर आलं आहे. नव्या गाडीची पहिली झलक त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

डीपीने त्याच्या नव्या गाडीमध्ये त्याच्या कुटुंबाला बसून एक राउंड मारलेला पाहायला मिळत आहे. इतकंच नव्हे तर त्याच्या या नव्या गाडी घेण्यामागचं कारणही समोर आलं आहे. डीपीने व्हिडीओ शेअर करत नवी गाडी घेण्यामागचं कारण सांगितलं आहे. व्हिडीओमध्ये डीपी असं बोलताना दिसत आहे की, “असं काहीतरी करायचं जेणेकरुन लोकांनी आपलं साम्राज्य बघावं. दीड वर्षांपूर्वी वडिलांनी एक स्वप्न पाहिलं होतं. त्यांच्या नातवडांनी सनरुफमधून बाहेर यावं असं त्यांना नेहमी वाटायचं आणि आज तो दिवस आहे जेव्हा या सनरुफमधून माझी मुलं बाहेर आली”.

आणखी वाचा – “गुड बाय यश अरुंधती देशमुख”, ‘आई कुठे…’ मालिकेने निरोप घेताच अभिनेत्याची भावुक पोस्ट, म्हणाला, “अस्वस्थ वाटत होतं आणि…”

View this post on Instagram

A post shared by Marathi Celeb's Katta (@marathicelebkatta)

पुढे तो म्हणाला, “माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य बघा, या माझ्या आईच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य बघा. गाडी घेण्याचं कारण फक्त एकच वडिलांना हेच हवं होतं की, त्यांच्या नातवंडांनी या सनरुफमधून बाहेर यावं. त्याचा ( सनरुफ ) आनंद त्यांनी घेतला पाहिजे. फक्त या गोष्टीसाठी ही नवीन गाडी घेतली. माझ्याकडे गाडी होती, ती जुनी गाडी विकली आणि ही नवीन गाडी घेण्याचं कारण म्हणजे फक्त वडिलांनी पाहिलेलं स्वप्न”.

आणखी वाचा – ‘रंग माझा वेगळा’ फेम रेश्मा शिंदे लवकरच लग्न करणार, थाटामाटात झालं केळवण, फोटो व्हायरल

पुढे त्याने म्हटलं आहे की, “आयुष्याचा आनंद हा फक्त पैशात नाहीये. तर, खरा आनंद आपल्या घरातल्यांच्या इच्छा पूर्ण करण्यात आहे”. असं म्हणत धनंजयने त्याच्या चाहत्यांना ही आलिशान गाडी खरेदी करण्याचं खरं कारण सांगितलं आहे. धनंजयच्या पोस्टवर असंख्य चाहत्यांनी या नव्या गाडीसाठी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अंकिता वालावलकरने, “शेवटी भाव कोणाचो” अशी कमेंटही केली आहे.

Tags: Bigg Boss Marathi  Season 5dhananjay powarDhananjay Powar New Car
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Tharla Tar Mag Serial Update

Tharla Tar Mag : सायली-अर्जुन मिळून लावणार मॅसेज प्रकरणाचा छडा, प्रियाचा हा डावही फसणार का?, मालिकेत मोठा ट्विस्ट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.