रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मुंबईहून कर्जत अन् कर्जतहून थेट मालिकेचा सेट”, मतदानानंतर शुटींगसाठी पोहोचली जुई गडकरी, म्हणाली, “एका मताने फरक…”

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 20, 2024 | 10:59 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tharala Tar Mag serial fame actress Jui Gadkari reached Karjat from Mumbai for voting and again live Karjat for shooting also she shared a post and appealed to vote.

मतदानासाठी मुंबईहून कर्जतला आणि कर्जतहून मुंबईला पोहोचली जुई गडकरी, शेअर केली खास पोस्ट, मतदानाचेही केलं आवाहन

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election) मतदानाला सुरुवात झाली आहे. संपूर्ण राज्यात आज २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. सकाळपासूनच सर्वच मतदान केंद्रांवर नागरिकांनी गर्दी केली होती. सामान्य नागरीकांसह अनेक कलाकार मंडळीदेखील आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत. अनेक कलाकारांनी मतदानानंतर शाई लावलेल्या बोटाचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि या फोटोसह त्यांनी आपल्या चाहत्यांना व मतदारांना मत देण्याचे आवाहनही केलं आहे. अशातच ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रे जुई गडकरीनेदेखील तिचा मतदानानंतरचा फोटो शेअर केला आहे. (jui gadkari vote)

अभिनेत्री जुई गडकरी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात रहात असते. त्याचबरोबर अभिनेत्री सोशल मीडियाद्वारे आपल्या कामानिमित्त माहितीदेखील शेअर करत असते. अशातच तिने आज मतदानानंतरचा फोटो शेअर केला आहे आणि या फोटोमुळे अभिनेत्रीचे कौतुक होताना दिसत आहे. अभिनेत्री जुई गडकरी ही मुळची कर्जतची राहणारी आहे. त्यामुळे आज पार पडणाऱ्या मतदानासाठी ती कर्जतला गेली होती आणि कर्जतहून पुन्हा कामानिमित्त मुंबईला आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Jui Gadkari (@juigadkariofficial)

आणखी वाचा – “वाटलं होतं ३० वर्षे पूर्ण करु पण”, घटस्फोटाच्या निर्णयानंतर रहमानने पहिल्यांदाच व्यक्त केल्या भावना, म्हणाला, “या नाजुक काळात…”

जुईने याचबद्दलची पोस्ट शेअर केली आहे. बोटाला शाई लावलेला फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये असं म्हटलं आहे की, “मुंबई ते कर्जत, कर्जतला मतदान, मग मतदानानंतर पुन्हा कर्जत ते मढ आयलँड”. तसंच या प्रवासाबद्दल तिने म्हटलं ही की, “ट्रेनने मेट्रो, मेट्रोनंतर रिक्षा, रिक्षाने जेट्टी, जेट्टीवरुन बोट, मग पुन्हा रिक्षा आणि मग रिक्षाने सेटवर”. यापुढे “हे फक्त मतदान करण्यासाठी! होय, एका मताने फरक पडतो… जा आणि मतदान करा!” असंही म्हटलं आहे.

आणखी वाचा – ‘पारू’ फेम शरयू सोनावणेने शेअर केली लग्नाची गोड आठवण, म्हणाली, “पहिल्या दिवसापासूनच…”

दरम्यान, जुईच्या मतदानाच्या या प्रवासासाठी तिच्या अनेक चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे. जुईने शेअर केलेल्या मतदानाच्या फोटोखाली अनेकांनी कमेंट्स करततीचे कौतुक केले आहे. “जबाबदार आणि आदरणीय”, “जबाबदार नागरिक”, “शाब्बास” अशा अनेक कमेंट्स करत चाहत्यांनी जुईच्या फोटोला प्रतिसाद दिला आहे. तसंच अनेकांनी “मतदानाच्या दिवशी सुट्टी नाही का” असा प्रश्नही विचारला आहे. जुईचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

Tags: jui gadkari votetharala tar mag fame jui gadkaritharala tar mag fame jui gadkari vote
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
BJP’s Vinod Tawde distributing money in Virar viral video Marathi actor and director Hemant Dhome has shared a tweet

“यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्र सोडवा”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला “हा ‘विनोद’...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.