शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अजबच प्रकार! ‘या’ हॉटेलमध्ये गेल्यानंतर विवाहित जोडप्यांचा होतो घटस्फोट, कित्येक घटनाही समोर, नक्की काय आहे प्रकरण?

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 18, 2024 | 7:00 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Divorce Hotel in Haarlem, Netherlands is known for divorce couples see the details

‘या’ हॉटेलमध्ये गेल्याने जोडप्यांचा होतो घटस्फोट, नेमकं कुठे आहे हे अजब हॉटेल? जाणून घ्या...

लग्नानंतर बहुतांश सगळी जोडपी ही हनिमूनला जातात. जेथे ते प्रेमाचे आणि एकत्र क्षण घालवतात. एकत्र फिरतात आणि निसर्गाचा आनंद घेतात. अशावेळी अनेक जोडपे हॉटेलमध्ये थांबतात. यादरम्यान त्यांच्यातील प्रेम आणखी बहरते. पण तुम्ही कधी अशा हॉटेलबद्दल ऐकले आहे का जिथे गेल्याने जोडप्यांचा घटस्फोट होतो. नेदरलँडमध्ये असं एक हॉटेल आहे जे ‘डिव्होर्स हॉटेल’ म्हणून ओळखले जाते. या हॉटेलमध्ये केवळ विवाहित जोडपेच बुकिंग करू शकतात आणि येथे येण्याचा उद्देश त्यांच्यातील नातेसंबंध संपवणे हाच असतो. (Divorce Hotel)

हे हॉटेल नेदरलँड्सच्या हार्लेम शहरात आहे. या हॉटेलला ‘द सेपरेशन इन’ असेही म्हणतात. ज्या जोडप्यांना वेगळे व्हायचे आहे, पण त्यासाठी लांब आणि कठीण कायदेशीर मार्ग पार करण्याचा कंटाळा आहे. अशा जोडप्यांना एकत्र आणून घटस्फोट घेणे अगदी सोपे करणे हा या हॉटेलचा मुख्य उद्देश आहे. या हॉटेलने एक वातावरण आणि एक अशी प्रणाली तयार केली आहे जी एकाच वेळी कायदेशीर सल्ला, मानसिक आधार आणि मध्यस्थी करते. जेणेकरून घटस्फोटाची प्रक्रिया कोणत्याही तणावाशिवाय जलद आणि शांततेने पूर्ण करता येते.

आणखी वाचा – Tula Shikvin Changalach Dhada : अधिपतीकडून चारुलताचा आई म्हणून स्वीकार, अक्षराची परिस्थिती अजूनही वाईट, नवं वळण

या हॉटेलमध्ये राहण्याचे मुख्य आकर्षण म्हणजे येथे येणाऱ्या जोडप्यांना घटस्फोटाच्या प्रक्रियेसाठी सहसा दीर्घ कायदेशीर लढा द्यावा लागत नाही. त्याऐवजी, या हॉटेलमध्ये घटस्फोटाची प्रक्रिया २४ तासांच्या आत पूर्ण होते. या हॉटेलमध्ये शांततापूर्ण आणि व्यावसायिक वातावरणात, दोघेजण एकाच ठिकाणी बसतात आणि मध्यस्थ, कायदेशीर सल्लागार व मानसशास्त्रज्ञ यांच्या मदतीने त्यांच्या नात्याला पूर्णविराम देतात. या हॉटेलमध्ये बुकिंग फक्त अशा जोडप्यांसाठी आहे जे विवाहित आहेत आणि त्यांनी लग्न संपवण्याचा निर्णय घेतला आहे.

आणखी वाचा – Navri Mile Hitlerla : बहिणीसाठी लीला एजेंच्या विरोधात जाणार, नात्यात पुन्हा दुरावा येणार, मोठा ट्विस्ट

या हॉटेलमध्ये जोडप्यांना त्यांच्या घटस्फोटाच्या प्रक्रियेत मदत करण्यासाठी व्यावसायिक सहाय्यही मिळते. हॉटेलमध्ये घटस्फोटादरम्यान, दोन्ही भागीदार एकत्र बसून प्रक्रिया समजून घेऊ शकतात आणि नंतर संमतीपत्रावर स्वाक्षरी करू शकतात, ज्यामुळे त्यांचे नाते कायदेशीररित्या संपुष्टात येते. यानंतर, एक कायदेशीर दस्तऐवज तयार केला जातो आणि दोन्ही भागीदार त्यांचे विवाह संपवू शकतात. जे त्यांच्यासाठी मानसिक आणि भावनिकदृष्ट्या एक मोठा दिलासा आहे.

Tags: Divorce Hotel NewsNetherlands Harlem Divorce Hoteltrending news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
tarak mehta ka ooltah chashmah fame mandar chandwadkar

'तारक मेहता…'मधील भिडेची पेरूच्या बागेत सफर, बायकोसह तिथेच केला डान्स, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.