शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीवर जीवघेणा हल्ला, हात फ्रॅक्चर, म्हणाली, “खूप वेदना…”

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 14, 2024 | 12:19 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bollywood actor Salman Khan ex-girlfriend Somy Ali attacked and her hand fractured.

सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीवर जीवघेणा हल्ला, हाताला फ्रॅक्चर झालं अन्...; दु:ख व्यक्त करत म्हणाली...

सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड आणि बॉलिवूड अभिनेत्री सोमी अली तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. ही अभिनेत्री सलमान आणि तिच्या नात्याबद्दलही मोकळेपणाने बोलत असते. दरम्यान, सोमी अलीवर जीवघेणा हल्ला झाल्याची बातमी समोर येत आहे. मानवी तस्करीचा बळी ठरलेल्या महिलेला वाचवण्याचा प्रयत्न आपण करत होतो, असा खुलासा खुद्द सोमीने केला आहे. यावेळी त्याच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्याचा हात फ्रॅक्चर झाला. एवढेच नाही तर तिला इतर अनेक दुखापतीही झाल्या आहेत. सोमी अली स्वतःला सामाजिक कार्यकर्त्या म्हणवते. (somy ali attack)

अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, मानवी तस्करीच्या पीडितेला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना तस्करांनी तिचा हात फिरवला. यामुळे तिच्या हाताला हेअरलाइन फ्रॅक्चर झालं आहे. याबद्दल सोमी म्हणाली की, “जेव्हा मी पीडितेला वाचवण्यासाठी माझ्या कारमधून बाहेर पडले, तेव्हा अचानक तस्कर आले, त्यांच्यापैकी एकाने माझा डावा हात पकडला आणि तो अशा प्रकारे फिरवला की मी हाताला पीळ बसला. देवाचे आभारी आहे की, यामुळे मला फक्त हेअरलाइन फ्रॅक्चर झालं आहे. पण मला खूप वेदना होत आहेत”.

View this post on Instagram

A post shared by Somy Ali (@realsomyali)

आणखी वाचा – Appi Amchi Collector मालिकेत नवा ट्विस्ट, अमोलने अप्पी-अर्जुनला सांगितलं आजार लपवण्यामागचे कारण, पुढे काय होणार?

सोमी पुढे म्हणाली की, “ती गेल्या १७ वर्षांपासून ‘नो मोअर टीयर्स’ मोहीम राबवत आहे आणि या काळात तिच्यावर झालेला हा ९वा हल्ला आहे. ते पीडित आणि तस्करांची एकत्र वाट पाहत होते. पीडितेला ती कामाला जात असलेल्या घरात मानवी तस्कर असल्याची कल्पना नव्हती. अशा स्थितीत सोमी तिच्या गाडीतून खाली उतरली. मानवी तस्करही तेथे आले. यावेळी त्याने सोमीचा हात फिरवला आणि तिचा हात फ्रॅक्चर झाला”.

आणखी वाचा – प्रसाद खांडेकरच्या लेकाचं अनोखं टॅलेंट, बालदिनानिमित्त अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ, म्हणाला, “काहीही बोलणाऱ्यांना…”

दरम्यान, अभिनेत्री आता तिच्या हाताच्या फ्रॅक्चरच्या वेदनेने ग्रासलेली आहे आणि सध्या आराम करत आहे. यातून बरं होण्यासाठी तिला ६ ते ८ आठवडे लागतील. तिचे डावे मनगट आणि हात खूप सुजले आहेत आणि त्यामुळे ती हात हलवू शकत नाही. तिचा हात प्लास्टरमध्ये असून तिला खूप काळ विश्रांती घ्यावी लागणार आहे. डॉक्टरांनी काही काळ हातावर प्लास्टर ठेवण्यास सांगितले आहे. यामुळे तिला कोणाशी हस्तांदोलनही करता येत नाही.

Tags: salman khan ex girlfriend somy ali attacksomy ali attacksomy ali attack news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Aishwarya Rai 

डोळ्यांवर, हातावर जखमा घेऊन पुरस्कार स्वीकारण्यासाठी पोहोचली होती ऐश्वर्या राय, अभिनेत्रीची 'ही' अवस्था पाहून नेटकरीही थक्क, फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.