‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अनेक नवनवीन वळण येत आहेत. मालिकेत अप्पी व अर्जुन यांना एकत्र आणण्यासाठी अमोल प्रयत्न करत होता आणि त्याच्या या प्रयत्नांना यश आले असून नुकतंच मालिकेत अप्पी व अर्जुन अमोलसाठी एकत्र आले. अर्जुनने अप्पी आणि अमोलबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे. अप्पी-अर्जुन दोघे अमोलसाठी एकत्र आले आहेत. त्यांना एकत्र आल्याचे पाहून प्रेक्षकही आनंदी झाल्याचे पाहायला मिळाले. मालिकेत सगळं काही ठीकचाललं असतानाच मीठाचा खडा पडला तो म्हणजे अमोलच्या आजारपणाचा. (Appi Aamchi Collector Serial Updates)
अमोलच्या प्रयत्नानंमुळे अर्जुन-अप्पी एकत्र आले आहेत. पण त्यांना एकत्र आणणारा अमोल आजारी पडला आहे. मालिकेत काही दिवसांपूर्वी त्याला आजार झाल्याचे समोर आले होते. मात्र हा आजार नक्की काय होता? याविषयी कुणालाच काहीच कल्पना नव्हती. अमोलने त्याच्या आजारपणाचे कारण सर्वांपासून लपवलं होतं. अमोलच्या मन:शांतीसाठी अमोलला झालेल्या आजाराचं सत्य लपवण्याचा निर्णय स्वप्नील आणि रुपालीने घेतला. दिवाळीच्या तयारीत सगळे असतानाच दीप्या अमोलच्या आजाराचं सत्य सर्वांसमोर मांडतो. हे ऐकून सगळे हादरतात.
रुपाली आणि तिच्या कुटुंबाला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतात. अमोल त्यांना समर्थन देत सांगतो की, हे सत्य लपवण्यामागे त्यांचा हेतू चांगला होता. अप्पा आणि बापूदेखील यावेळी अप्पी व अर्जुन यांना खडेबोल सुनावतात. तुमच्यातीळ हेकेखोरपणामुळे आणि तणावामुळे तुम्ही अमोलकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचाच परिणाम आता अमोलला भोगावे लागत असल्याचे त्यांनी सुनावलं.
त्यामुळे आता या सर्वांवर अप्पी व अर्जुन काय निर्णय घेणार? हे लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दरम्यान, आता या सर्वाचा अप्पी व अर्जुन यांच्या नात्यावर काय परिणाम होणार? अप्पी व अर्जुन दोघे अमोलमुळे पुन्हा एकत्र येणार का? अमोलच्या आजारामुळे घाबरलेले अप्पी आणि अर्जुन आता सावरणार का? हे आगामी भागातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे.