रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सूरज चव्हाण बदलला असल्याचं अंकिताचं मत, गावात गेल्यानंतरही डावललं, म्हणाली, “मलाच अडकवण्याचा प्रयत्न…”

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 12, 2024 | 6:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 Fame Kokan Hearted Girl Ankita Walawalkar Says I Choose Not To Talk About Suraj Chavan

“सूरजच्या गोष्टींमध्ये मी न बोलणं पसंत केलं आहे”, अंकिता वालावलकरने सूरजबद्दल मांडलं स्पष्ट मत

‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर दोन दिवसांपूर्वीच सूरज चव्हाणला भेटण्यासाठी त्याच्या मोढवे गावी गेली होती. या भेटीचा व्हिडीओ अंकिता वालावलकरने आपल्या युट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिताने सूरजच्या गावी जाण्यापासून ते गावी त्याच्याबरोबर केलेल्या खास गप्पा, शेतातली मजामस्ती, तसंच अंकिता व तिच्या होणाऱ्या नवऱ्याने सूरजच्या कुटुंबियांबरोबर साधलेल्या खास संवादाची झलक पाहायला मिळत आहे. यावेळी सूरजने अंकिता व कुणाल यांना भेटण्यासाठी तब्बल एक तास उशीर केला. अंकिताने सूरजला ते पोहचले असल्याचे सांगूनही सूरज पोहायला गेला होता. त्यानंतर सूरज त्यांना न भेटता थेट घरी जातो. यावेळी अंकिता सूरजला सादही देते. पण सूरज फक्त ‘नमस्कार’ म्हणत घरी निघून जातो. एकूणच या व्हिडीओमध्ये अंकिताने सूरजच्या बदललेल्या वागणुकीबद्दलही भाष्य केलं आहे. (Ankita Walawalkar on Suraj Chavan Behavior)

या व्हिडीओमध्ये अंकिता सूरजबद्दल असं म्हणाली आहे की, “मला सगळ्यांना सांगायला आवडेल की, आम्ही सूरजला आधीच सांगितले होते की, आम्ही इथे पोहोचलो आहोत. त्यानंतर एक तास सूरज नव्हता. मग तो आला आणि आम्हाला न भेटताच तो घरात गेला. मग तो आम्हाला भेटला. आणि हे सगळं जे आहे तो कुणाच्या तरी म्हणण्याप्रमाणे करत आहे. हा तो सूरज नाही ज्याला मी ‘बिग बॉस’च्या घरात भेटले होते. त्याला इथे जसं सांगितलं जात आहे तसा तो वागत आहे आणि हेच दाखवण्यामागचे कारण आहे”.

View this post on Instagram

A post shared by Ankita PrabhuWalawalkar (@kokanheartedgirl)

आणखी वाचा – चारुलता व भुवनेश्वरी यांच्यातील गोंधळात अक्षराला वेडं ठरवण्याचा प्रयत्न, मोठं संकट, अधिपतीची साथ मिळणार?

यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “सूरजच्या काळजीपोटी मी नेहमीच बोलत आली आहे. बऱ्याच गोष्टी मी स्पष्टपणे सांगितल्या आहेत. काही गोष्टींमध्ये मी न बोलणं पसंत केलं आहे. पण या सगळ्यामुळे मलाच अडकवण्याचा प्रयत्न, माझ्या बाबतीत काहीतरी चुकीचं होण्याचा प्रयत्न मला जाणवला. सूरजकडे गेल्यावरही मला जाणवलं आणि तिथून आल्यावरही जाणवलं. माझेही काही चाहते आहेत त्यांना उत्तर देणं मला भाग वाटत आहे. या सगळ्याबद्दल मी लवकरच बोलेन”. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट करत अंकिताची बाजू घेतली आहे.

आणखी वाचा – तुळजाने सूर्याला केलं प्रपोज, होकार देणार का?, ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मोठा ट्विस्ट

“अंकिता तु मनाने खूप छान आहेस, लोकं काहीही अफवा पसरवतात परंतु तू सूरजशी मैत्री जप, तो चांगला मुलगा आहे”, “मराठीत एक म्हण आहे, “जिथे गुळाची ढेप, तिथे मुंगळे जास्त”. असाच काहीसं तिथे चालले आहे”, “अंकिता, असला प्रकार सगळीकडे चालतो. त्याचा विचार करु नकोस. तू सूरजला लांब करु नकोस, त्याला तुमच्यासारख्यांची खरच गरज आहे”, “पैसा आला ना की चांगले चांगले बिघडतात आणि या सुरजला बिघडवणारे त्याच्याच परिवारातले आजूबाजूचे सदस्य आहेत. पण तू खूप चांगली मुलगी आहे”. अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.

Tags: Ankita Walawalkar on Suraj Chavan BehaviorAnkita Walawalkar Opinion on Suraj's Changed BehaviorAnkita Walawalkar Suraj Chavan Meet
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
tulsi vivah 2024

तुळशीच्या लग्नाला करा 'हे' तीन फायदेशीर उपाय, धनलाभासह मिळतील अनेक फायदे, शास्त्र काय सांगतं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.