शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नाईलाजास्तव मी माझ्या देशाशी प्रामाणिक कारण, अन्नू कपूर यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, “बायको अमेरिकन…”

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 11, 2024 | 4:18 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
annu kapoor on indian citizenship

अन्नू कपूर यांनी देशभक्तीबद्दल काय भाष्य केले ?

बॉलिवूड अभिनेते अन्नू कपूर सध्या खूप चर्चेत आहेत. आजवर त्यांनी अनेक मालिका-चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकतेच त्यांनी अमेरिकन  नागरीकत्त्वाबद्दल बोलताना गीता व इस्लामबद्दल भाष्य केले आहे. एका ठिकाणी त्यांनी स्वतःला नास्तिक म्हंटले आहे तर दुसरीकडे त्यांनी गीता महान असल्याचे सांगितले आहे. अन्नू यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये देशभक्तीची तुलना सुंगधी अत्तराबरोबर केली आहे. अन्नू हे त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही अधिक चर्चेत राहिले आहेत. आतापर्यंत अन्नू हे तीन वेळा लग्नबंधनात अडकले आहेत. १९९२ साली ते अमेरिकन वंशाच्या अनुपमाबरोबर लग्नबंधनात अडकले. मात्र त्यांचे हे लग्न एका वर्षापेक्षा अधिक काळ टिकू शकले नाही. त्यांनंतर ते अजून दोन वेळा लग्नबंधनात अडकले. (annu kapoor on indian citizenship)

पहिले लग्न मोडल्यानंतर ते दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकले. हे लग्न जवळपास १० वर्ष टिकले. त्यानंतर दुसऱ्या पत्नीपासूनदेखील ते वेगळे झाले आणि पुन्हा एकदा ते पहिल्या पत्नीबरोबर लग्नबंधनात अडकले. त्यांना दोन मुलं आहेत. पत्नी-मुलं अमेरिकन असतानाही अन्नू यांनी कधीही अमेरिकन होण्याचा विचार नाही केला. परदेशात राहण्यासाठी त्यांनी कधीही प्रयत्न केले नाहीत, तसेच याबद्दल त्यांनी पत्नी व मुलांवरदेखील जबरदस्ती केली नाही. त्यांनी सांगितले की, “जसे १५ ऑगस्ट व 2६ जानेवारी येते तेव्हा लोकांच्या मनात देशभक्ती जागी होते. तसेच क्रिकेटच्या मैदानात झेंडा हातात घेतल्यावर देशभक्ती आठवते”.

आणखी वाचा – ‘शक्तिमान’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार, टीझरही प्रदर्शित, नव्या रुपात बच्चे कंपनींचं मनोरंजन होणार, व्हिडीओ एकदा पाहाच

View this post on Instagram

A post shared by ANNU KAPOOR (@annukapoor)

पुढे ते म्हणाले की, “देशभक्ती सुगंधित अत्तर नाही की कोणत्या कार्यक्रमाला जाताना, लग्नात जाताना मारला जातो. देशभक्ती तुमच्या शरीरात २४ तास रक्ताप्रमाणे वाहिली पाहिजे. त्यामुळे मला लोकांना हेच सांगायचं आहे की जर तुमची देशभक्ती ही वेळ किंवा एखाद्या खास दिवसांवर अवलंभून असेल तर ती देशभक्ती नाही”.

आणखी वाचा – ‘बिग बॉस’च्या घरात तंबाखू खातो विवियान डिसेना, दात घाणेरडे असल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं, बायको म्हणाली, “ब्रॅण्डचा तंबाखू…”

नंतर अन्नू म्हणाले की, “माझी पत्नी अमेरिकन आहे पण मी कधीही अमेरिकन नागरिकत्वासाठी अर्ज केला नाही. मी मरेन पण तिकडचा पासपोर्ट घेणार नाही. मी खूप एकनिष्ठ असा व्यक्ती आहे. हा देश मला खड्ड्यात टाकुदे किंवा मला काहीही नको मिळूदे पण मी माझ्या देशाशी एकनिष्ठ राहणार”. काही दिवसांपूर्वी अन्नू यांनी धर्मग्रंथावरदेखील भाष्य केले होते. त्यावेळीदेखील ते खूप चर्चेत आले होते.  

Tags: actorannu kapoorbollywood actorstatement
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
the great indian kapil show

‘कपिल शर्मा शो’मध्ये नवज्योत सिंह सिद्धू पुन्हा परतणार?, अर्चना पूरण सिंह यांचा पत्ता कट, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.