शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi फेम छोटा पुढारीने थेट मुंबई गाठत घेतली निक्की-अरबाजची भेट, दोघांनी घन:श्यामला दिलं ‘हे’ आश्वासन, म्हणाले…

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 10, 2024 | 1:48 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 fame Chhota Pudari aka Ghanshyam Darwade came to Mumbai and met Nikki Tamboli and Arbaaz Patel video shared on Instagram

मुंबई गाठत छोटा पुढारीने घेतली निक्की व अरबाज यांची भेट, सोशल मीडियावर शेअर केला खास व्हिडीओ

‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व संपले असले तरी या शोची आणि शोमधील स्पर्धकांची चर्चा काही कमी झालेली नाही. ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व संपल्यानंतर घरातील सर्वच स्पर्धक एकमेकांच्या भेटी घेत आहेत. गेल्या काही दिवसांत इरीना व वैभव ही डीपी यांच्या गावी गेल्याचे पाहायला मिळाले. तसंच डीपी, वैभव, इरीना ही तिघे सूरजच्या गावी गेले होते. नुकतंच अंकितानेही सूरजच्या गावी जात त्याची भेट घेतली. असं असतानाच छोटा पुढारी म्हणजे घन:श्याम दरवडेने मुंबईत येऊन निक्की व अरबाज यांची भेट घेतली आहे. या खास भेटीचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Ghanshyam Darwade Nikki Tamboli and Arbaaz Patel Meet)

या व्हिडीओमध्ये अरबाजने कॅमेरा पकडला असून यामध्ये निक्की व घन:श्यामही आहेत. तर अरबाज या व्हिडीओमध्येयसा म्हणतो की, “घन:श्याम मुंबईत व्लॉग बनवण्यासाठी आला होता”. इतक्यात घन:श्याम “असं काहीही नाही” असं म्हणतो. त्यानंतर निक्कीही घन:श्याम आम्हाला भेटण्यासाठी आला होता” असं म्हणते. पुढे ती असं म्हणते की, “तुझ्या वाढदिवसाला डिसेंबर महिन्यात आम्ही तुझ्या गावी येणार आहोत, तुझा वाढदिवस साजरा करायला आणि तुझ्या सर्व कुटुंबियांनाही अमाही भेटणार आहोत”.

View this post on Instagram

A post shared by Chota Pudhari (@chotapudhari_official)

पुढे आनंदाच्या भरात घन:श्याम म्हणाला की, “२५ डिसेंबरला हे दोघं येणार आहेत. निक्की ताई बोलली मग विषय संपला”. पुढे घन:श्याम अरबाज दाजी म्हणता म्हणता भाई म्हणतो आणि घन:श्यामची ही चूक निक्की अचूक हेरते आणि म्हणते “बाई काय म्हणतोय दाजी…” यावर घन:श्याम म्हणतो, “नाही दाजी नाही भाई… दाजी करायचा विचार नक्कीच चालू आहे” आणि यावर निक्कीसुद्धा हो असं उत्तर देते. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.      

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा लग्नबंधनात, साधेपणाने केला विवाह, व्हिडीओ व फोटो व्हायरल

दरम्यान,  “माझी निक्कू ताई आणि अरबाजची भेट” असं कॅप्शन देत घन:श्यामने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओला तिघांच्याही चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. “किती छान”, “खूप सुंदर”, “बाई काय हा प्रकार”, “मस्त” अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे. निक्की, अरबाज आणि घन:श्याम हे बिग बॉसच्या घराबाहेरही एकत्र असल्याचे पाहून नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचे वृद्धापकाळाने निधन, वयाच्या ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, कुटुंबियांना दु:ख अनावर

‘बिग बॉस मराठी’च्या घरात पहिल्या दिवसापासून दोन गट पडल्याचे पाहायला मिळाले. यापैकी एका गटात निक्की, अरबाज, वैभव, जान्हवी आणि घन:श्याम एकत्र खेळत होते. कालांतराने या ‘टीम ए’मध्ये फूट पडली आणि यांची जान्हवी व वैभव यांनी हा ग्रुप सोडला. पण निक्की, अरबाज आणि घन:श्याम यानी आपली मैत्री राखली. त्यामुळे आता या मैत्रीखातर निक्की-अरबाज छोटा पुढारीच्या वाढदिवसाला जाणार का? याची चाहते मंडळी वाट पाहत आहेत.

Tags: Arbaaz PatelGhanshyam Darwadenikki tamboli
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Marathi actress Kishori Godbole daughter become the brand ambassador of Apple company and she shared appreciation post for her

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची लेक बनली 'या' महागड्या मोबाईल कंपनीची ब्रॅंड अँबॅसेडर, आईने शेअर केली कौतुकास्पद पोस्ट, म्हणाली, “टॅलेंट असेल तर...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.