‘बिन कामाचा नवरा’, ‘दीड शहाणे’, ‘माझा पती करोडपती’, ‘गडबड घोटाळा’ यासारख्या अनेक चित्रपटात अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांनी एकत्र काम केलं आहे. विनोदाचं अचूक टायमिंग आणि हजरजबाबीपणा हे दोन्ही विनोदी कलाकारांचे मिळतेजुळते गुण. अशोक सराफ यांना निळू फुले सिनियर जरी असले तरी त्यांच्यात मैत्रीपूर्व बॉण्डिंग होत. (Ashok Saraf Nilu Phule Incidence)
सह कलाकार म्हणून काम करत असताना जेव्हा निळू भाऊंसोबत काम करायचं असायचं तेव्हा अशोक सराफ यांना विशेष आवडायचं असं त्यांनी त्यांच्या मी बहुरूपी या आत्मचरित्रात सांगितलं आहे. मात्र एक वेळ अशी आली की, त्यांनी माझा नाद सोडून दिला असं अशोक मामा निळू फुले यांच्याबद्दल का म्हणाले याबाबद्दलचा एक किस्सा अशोक सराफ यांनी त्यांच्या मी बहुरूपी या आत्मचरित्रात सांगितलं आहे.
पाहा अशोक सराफ निळू फुलेंबद्दल असं का म्हणाले (Ashok Saraf Nilu Phule Incidence)
निळूभाऊंचं वाचन दांडगं होतं. राजकीय आणि सामाजिक भान त्यांना होता. समाजासाठी काहीतरी करण्याची आस त्यांनी शेवट्पर्यंत जपली. आणि त्यात त्यांचा हातखंडा ही होता. मात्र या गोष्टीचा त्यांनी कधी गाजावाजा केला नाही. अशातच नावापुढे डॉक्टर लागल्यानंतर त्यांनी सामाजिक कृतज्ञता निधीसाठी पैसे देखील जमवले आणि याब्ब्दल बरेचदा ते भाष्य करत असेही अशोक मामा म्हणाले आहेत. सेटवर एकत्र असतानाचा एक किस्सा सांगताना अशोक मामा म्हणाले आहेत की, काही वेळा मला ते पुस्तकं वाचायचा सल्ला देत. वाच रे लोहिया वाच, असं सांगत.(Ashok Saraf Nilu Phule Incidence)
हे देखील वाचा – “एक काळ गाजवणाऱ्या महानायकाला मिळत नाहीये काम” स्वतः व्यक्त केली खंत
परंतु गंभीर पुस्तकांच्या दुनियेत मी कधी रमलो नाही, माझं सगळं लक्ष अभिनयावरच होतं. एकदा मी त्यांना म्हटलं, ‘निळूभाऊ, कितीही वाचलं, काहीही वाचलं तरी शेवटी दिग्दर्शकानं सांगितलं उड्या मार की मी उड्याच मारणार!’ शेवटी त्यांनी माझा नाद सोडून दिला. मात्र, निळूभाऊंसारखा सहकलाकार असला की मी सुद्धा खुलायचो हे कबूल करायलाच हवं.(Ashok Saraf Nilu Phule Incidence)
सहकलाकार म्हणून निळू फुले यांचं आणि अशोक कोठारे यांचं उत्तम बॉण्डिंग असल्याचं या किस्स्यांवरून कळून येतंय.
