शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझी भिकाऱ्यासारखी अवस्था”, भारत सो़डून गेली राखी सावंत, अटक होण्याच्या भीतीने बिकट परिस्थिती, म्हणाली, “किती भीक मागणार?”

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 9, 2024 | 3:00 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Drama Queen Rakhi Sawant revealed that she is not coming to India for fear of being arrested

ड्रामा क्वीन राखी सावंतने अटक होईल या भीतीने भारतात येत नसल्याचा खुलासा केला आहे

बॉलिवूड अभिनेत्री व ड्रामा क्वीन म्हणून लोकप्रिय असलेली राखी सावंत सोशल मीडियावर काहीना काही कारणाने चर्चेत राहत असते. राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून भारतात राहत नाहीये. ती बऱ्याच दिवसांपासून दुबईत आहे. पती आदिल खान दुर्रानीने केलेल्या तक्रारीमुळे राखीविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अटक होण्याच्या भीतीने ती भारतात परतत नाही आणि याचा खुलासा राखीने स्वत:चं केला आहे. याबद्दल बोलताना राखी म्हणाली की, जर तिला अटक झाली तर शाहरुख खान आणि सलमान खान तिला मदत करतील पण ती त्यांची मदत घेणार नाही. (Rakhi Sawant Arrest Fear)

‘इन्स्टंट बॉलीवूड’शी संवाद साधताना राखी सावंतने भारतात न परतण्याचे कारण सांगितले. भारतात परत आल्यास तिच्यावर प्रलंबित असलेल्या खटल्यामुळे पोलीस तिला अटक करतील अशी तिला भीती वाटत आहे. याबद्दल राखी असं म्हणाली की, “मी कोणाची मदत मागत नाही, ही माझी लढाई आहे. सलमान भाई, फराह खान आणि शाहरुख जी मला एका सेकंदात जामीन देतील. पण मी कोणाची मदत मागत नाही. हा माझा लढा आहे, किती दिवस मी सर्वांसमोर हात पसरत राहणार, किती दिवस भीक मागत राहणार. मी आता भिकारी झाली आहे. माझा भारतातील न्यायालयांवर विश्वास आहे. कारण मी कोणतीही चूक केलेली नाही”.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – ‘भुल भूलैय्या’च्या साँग लाँचला सोनू निगमकडे दुर्लक्ष, सगळे कार्तिक आर्यनकडेच धावत गेले अन्…; अपमानास्पद वागणूक

यापुढे ती म्हणाली की, “माझी चूक नसतानाही मी भिकाऱ्यासारखी परिस्थितीला तोंड देत आहे. पण मी कोणाचीही मदत मागणार नाही. न्यायालयाच्या आदेशामुळे मला घरोघरी भटकावे लागत असल्याने अक्षरश: माझी अवस्था भिकाऱ्यासारखी झाली आहे”. काही काळापूर्वी राखी सावंतने दुबईतून स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये ती रडताना आणि मदत मागताना दिसली होती. या व्हिडीओमध्ये राखी पंतप्रधान मोदी आणि भाजपकडे मदतीची याचना करताना दिसली होती.

आणखी वाचा – Video : पायऱ्या उतरताना विजय देवरकोंडाचा गेला तोल, थेट घसरतच खाली आला अन्…; व्हिडीओ व्हायरल

यावेळी तिने सांगितले होते की तिला तिच्या देशात परत यायचे आहे, परंतु हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा तिला जामीन मिळेल आणि कोणत्याही कायदेशीर अडथळ्याशिवाय ती देशात परत येऊ शकते. माझे निर्दोषत्व सिद्ध करणारे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. तरीही मला का गोवले जात आहे? माझ्यावर खोटे आरोप केले जात आहेत.  अशा प्रतिक्रिया तिने व्यक्त केल्या आहेत.

Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
gauri in suryavamsam

दोन वेळा घटस्फोट, एकट्यानेच मुलाचा सांभाळ अन्…; आता कसं आयुष्य जगते 'सुर्यवंशम'मधील गौरी, स्ववतःचं नावंही बदलेलं कारण…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.