शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रिचा चड्डा व अली फजलने ठेवलं लेकीचं नाव, अर्थ आहे फारच वेगळा, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 7, 2024 | 1:36 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Richa Chadha and Ali Fazal Baby Girl Name

रिचा चड्डा व अली फजलने ठेवलं लेकीचं नाव, अर्थ आहे फारच वेगळा

Richa Chadha and Ali Fazal Baby Girl Name : ऋचा चढ्ढा व अली फजल यांनी १६ जुलै रोजी त्यांच्या बाळाचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियाद्वारे बाळाची पहिली झलक दाखवली. यानंतर आता ऋचा व अलीने त्यांच्या लेकीचं नाव नेमकं काय ठेवलंय याचा खुलासा केला आहे. सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत त्यांनी ही आनंदाची बातमी दिली आहे. या जोडप्याने आपल्या मुलीचे नाव झुनेरा इदा फजल ठेवल्याचा खुलासा केला आहे. व्होगला दिलेल्या मुलाखतीत, दोघांनी पालकत्वाबद्दल भाष्य केलं आणि त्यांच्या लेकीच्या नावाचा खुलासा केला. रिचा चड्ढा व अली फझल यांच्या घरी सध्या आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

समोर आलेल्या फोटोंवरुन पालक झाल्यानंतरचा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. यावेळी बोलताना अली फझल म्हणाला, “बाळ होणे ही प्रत्येकाची पोकळी भरुन काढते ज्याची तुम्हाला जाणीवही नाही. हा भाग मला आश्चर्यचकित करत नाही. आता हे काम करणे कठीण आहे. जेव्हा मी घर सोडतो तेव्हा मला खूप चिंता वाटते कारण मला फक्त तिला पाहायचे आहे. माझे बाळ झुनेरा नेहमी ऋचा आणि माझ्या आसपास असते”.

आणखी वाचा – हार्दिक पांड्याच्या एक्स पत्नीने मित्राकडून नेसवून घेतली साडी, व्हिडीओही केला शेअर, विचित्र वागणं पाहून नेटकरी भडकले

View this post on Instagram

A post shared by VOGUE India (@vogueindia)

१६ जुलै रोजी सामायिक केलेल्या संयुक्त निवेदनात, जोडप्याने म्हटले, “१६ जुलै २०२४ रोजी आमच्या घरी चिमुकल्या बाळाचं आगमन झालं आहे. आमचं कुटुंब प्रचंड आनंदी आहे. आम्ही आमच्या शुभचिंतकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आणि आशीर्वादाबद्दल कायम आभारी आहोत. आशीर्वाद, ऋचा चढ्ढा आणि अली फजल”. या जोडप्याने त्यांच्या लहान मुलाची पहिली झलक इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले, “आमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या सहयोगाची घोषणा करण्यासाठी एक सहयोग पोस्ट करत आहे!! आम्ही खरोखरच धन्य झालो आहोत. आमची मुलगी आम्हाला खूप व्यस्त ठेवते. त्यामुळे, तुमच्या प्रेम व आशीर्वादाबद्दल तुम्हा सर्वांचे आभार.”

आणखी वाचा – “हिंदू आहे म्हणून बिनधास्त काम केलं”, एकता कपूरचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली, “तुम्ही धर्मनिरपेक्ष करत…”

जवळपास आठ वर्षे डेटिंग केल्यानंतर रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी २०२० मध्ये लॉकडाऊन दरम्यान स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत लग्न केले. नंतर त्यांनी दिल्लीत हळदी आणि संगीत समारंभ आणि २०२२ मध्ये मुंबईत रिसेप्शनसह त्यांच्या आयुष्यातील आनंदाचे हे क्षण एन्जॉय केले. या जोडप्याने या वर्षी १६ जुलै रोजी त्यांच्या बाळाचे स्वागत केले. दोघांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, रिचा चड्ढा अखेरची संजय लीला भन्साळीच्या ‘हीरामंडी’मध्ये दिसली होती. दुसरीकडे अली फजलने ‘मिर्झापूर ३’ मध्ये कामाला सुरुवात केली.

Tags: bollywood newsRicha Chadha and Ali FazalRicha Chadha and Ali Fazal Baby Girl Name
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
priyanka chopra daughter dance

प्रियांका चोप्राची लेक आहे फारच हुशार, दोन वर्षाची मालती शिकत आहे डान्स, 'ते' दृश्य पाहून नेटकरीही हैराण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.