जगात आई मुलीच्या नात्याबद्दल कोणी कितीही वेळ बोलू शकत. हे नातं इतर नात्यांपेक्षा जगावेगळं आहे हे कुणाला निराळं सांगण्याचीही गरज नाही. कलाविश्वात आई मुलीच्या नात्यांबद्दल बऱ्याच जणींनी आजवर भाष्य केलंय. अशातच आई मुलीच्या नात्याचा पदर उलगडणारी एक खास पोस्ट महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री नम्रता संभेराव हिने केली आहे. अभिनेत्री नम्रता संभारावने तिच्या आईच्या वाढदिवसाचं औचित्य साधत एक खास पोस्ट सोशल मीडियावरून शेअर केली आहे. (Namrata Sambherao Mother)
आईसोबतचा एक फोटो पोस्ट करून नम्रताने पोस्ट शेअर करत लिहिलंय, Happy birthday young लेडी, माझ्या आयुष्यातली माझी सगळ्यात मोठी support system माझी मम्मी. बालवाडीत असताना नृत्य स्पर्धेत भाग घेतला होता तेव्हा मम्मीने मला सनई चा सूर ह्या गाण्यावर dance बसवून दिला, अजूनही मी नाही विसरू शकत मला मम्मी steps शिकवत होती तेव्हा मम्मी ज्या तालात नाचत होती त्याच तालात तिची लांबसडक केस वेणी डुलत होती सुंदर दिसायची तेव्हाही माझ्या मम्मी मुळे मी ह्या क्षेत्रात येऊ शकले हे तितकच खरं, सगळे मला विचारतात आप क्या खाते हो त्याचं गूढ माझी मम्मी.
पाहा नम्रताची आईसाठीची भावुक पोस्ट (Namrata Sambherao Mother)
तिला हि सगळं येत डान्स, गाणं, अभिनय, स्वयंपाक तिच्यातला भावनिक भाव कट टू कट उचललाय.. पूर्वी जेव्हा छोटे मोठे रोल करायचे ह्या क्षेत्रात अगदी पासिंग वगरे तेव्हा माझ्यासोबत प्रवास करायची दिवसभर थांबायची माझ्या इतकाच तिचा struggle ही मोठा आहे, जिद्द महत्वाकांक्षा उत्साह आशा मेहनत माया मम्मीकडून मिळाली आणि मी ती कायम जपून ठेवीन माझ्या आयुष्यातलं तुझं स्थान अव्वल नंबर वर आहे एक सांगू माझी मम्मी पण जरा मस्तीखोर आहे कधी गप्पा मारताना मला भानच रहात नाही मम्मी शी गप्पा मारतेय कि मैत्रिणी सोबत, स्वतःचे निर्णय अपेक्षा कधीच लादल्या नाहीत, आम्ही जे करू त्यात सपोर्ट करणारी माझी मम्मी किती आणि काय सांगू. (Namrata Sambherao Mother)
एवढ्याश्या शब्दात तीच वर्णन नाही होऊ शकत पण आज काही मोजक्या जुन्या आठवणींना उजाळा द्यावासा वाटला I LOVE YOU MY MOMMY तर अशी माझी मम्मी लाखात एक आहे ती best आई बायको सासू मैत्रीण आणि आज्जी आहे आणि आत्ता जसं वर्ष वय पुढे सरकतंय तशी ती दिवसेंदिवस तरुण होत चालली आहे मनाने आणि मला ते खूप आवडतंय, मम्मी तुझ्यामुळे माझं अस्तित्व आहे मला तुझ्या पोटी जन्म दिलास आणि इतकं मेहनती बनवलंस मी आयुष्यभर ऋणी, तुझी मान अशीच उंचावत ठेविन promise. (Namrata Sambherao Mother)
हे देखील वाचा – तुला शिकवीन चांगलाच धडा! मृणाल यांनी कविता मेढेकर यांना दिली सक्त ताकीद
नम्रताने तिच्या आईसाठी केलेल्या या भावुक करणाऱ्या पोस्ट मधून तिने तिच्या आईचे आभार व्यक्त केले आहेत.
