रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“इतका गर्व कुठून आला?”, करीना कपूरची चाहतीबरोबरची वागणूक पाहून नेटकऱ्यांचा संताप, म्हणाले, “अहंकार…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 6, 2024 | 12:52 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kareena Kapoor Troll

करीना कपूरची चाहतीबरोबरची वागणूक पाहून नेटकऱ्यांचा संताप

Kareena Kapoor Troll : बॉलिवूड स्टार कपल करीना कपूर व सैफ अली खान नेहमीच चर्चेत असतात. ते त्यांच्या मुलांबरोबर अनेकदा स्पॉट होताना दिसतात. सध्या हे खान कुटुंबं मालदीवमध्ये सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटताना दिसले. मालदीवला एन्जॉय केल्यानंतर हे कुटुंब मुंबईला परतले आहे. करीन व सैफ नुकतेच तैमूर व जेह या त्यांच्या मुलांबरोबर विमानतळावर दिसले. जिथे एका मुलीने करिनाला फोटोसाठी विनंती केली, पण अभिनेत्रीने स्पष्टपणे नकार दिला. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वजण ‘बेबो’वर नाराज असून तिच्या वागण्यावर टीका करत आहेत.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये करीना कपूरने जेहचा हात पकडला आहे. सैफ अली खान त्यांच्याच पुढे चालत आहे आणि तैमूर अली खानही त्याच्याबरोबर आहे. एका मुलीने सेल्फीची विनंती केल्यावर करीना तिच्या कारकडे जाताना दिसत आहे. चाहतीच्या विनंतीवर करीना लगेच म्हणाली, “नाही”. आणि मग ती तिच्या गाडीत बसते आणि निघून जाते.

आणखी वाचा – ‘बिग बॉस मराठी’ फेम या सुप्रसिद्ध अभिनेत्रीने थेट गोव्यात उभारला आलिशान बंगला, फोटो समोर

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

करीना कपूर खानचे हे वागणे नेटकऱ्यांना काही पसंत पडलेले नाही. एकाने लिहिले आहे की, “करीना गर्वाची शिकार झाली आहे”. दुसऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे की, “हिच्यात इतका गर्व कुठून आला आहे”. तर अनेकजण असे म्हणताना दिसत आहेत की, “करीनाला इतका अहंकार का आहे?”. करीनाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर २००० साली ‘रिफ्युजी’ चित्रपटातून इंडस्ट्रीत एंट्री करणारी करीना १ नोव्हेंबरला रिलीज झालेल्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटात दिसली होती.

आणखी वाचा – दिवाळीच्या सुट्टयांहून शूटिंगला परतताच सिंम्बासह आईलाही अश्रू अनावर, एकमेकांना मिठी मारुन रडले अन्…; व्हिडीओ व्हायरल

रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात अजय देवगण, रणवीर सिंग, अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, जॅकी श्रॉफ, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर यांच्याही भूमिका आहेत. सलमान खानचाही एक कॅमिओ आहे. सैफबद्दल सांगायचे तर, ‘देवरा: पार्ट १’ नंतर तो ‘ज्वेल थीफ: द रेड सन चॅप्टर’मध्ये दिसणार आहे. यामध्ये तो राजा चौहानच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.

Tags: bollywood gossipkareena kapoorKareena Kapoor Troll
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Appi Amchi Collector Serial Updates Amol only two months left to live a life emotional promo out

Appi Amchi Collector : अमोलकडे आता फक्त दोन महिने शिल्लक, या काळात आई-बाबांबरोबर घालवणार वेळ, भावुक प्रोमो समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.