शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लेक अबरामसाठी शाहरुख खानने खरेदी केली कोट्यवधींची कार, फक्त मोजक्याच व्यक्तींकडे आहे ही गाडी, फोटो व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 5, 2024 | 3:02 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bollywood actor Shah Rukh Khan bought an expensive luxury car for his little son Abram

शाहरुख खानने अबरामसाठी घेतली महागडी अलिशान कार, किंमत ऐकून व्हाल थक्क

बॉलिवूडमध्ये ‘किंग खान’ म्हणून लोकप्रिय असलेला अभिनेता म्हणजे शाहरुख खान. नुकताच त्याने साठव्या वर्षात पदार्पण केले. अभिनेता शाहरुख खान हा अभिनेता त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातोच, मात्र तो त्याच्या आलिशान जीवनशैलीसाठीसुद्धा चांगलाच प्रसिद्ध आहे. शाहरुखकडे ७००० कोटींहून अधिक संपत्तीसह, भव्य घरांपासून लक्झरी कारपर्यंत सर्वोत्कृष्ट चैनीच्या वस्तू आहेत. अशातच आता त्याने आपल्या लेकासाठी एक नवीन महाग अलिशान कार खरेदी केली आहे. शाहरुखने त्याचा सर्वात धाकटा मुलगा अबरामसाठी नवीन महाग आलिशान कार खरेदी केली आहे. शाहरुखने अबरामसाठी घेतलेली ही गाडी भारतातील सर्वात महाग एमपीव्ही कार आहे. (Shah Rukh Khan Bought Car For Abram)

शाहरुख खानच्या नवीन गाडीची किंमत जवळपास ३ कोटी रुपये आहे. शाहरुखच्या या महागड्या गाडीची निवड त्याच्या लक्झरी गाड्यांबद्दलचं प्रेम दर्शवतं. यापूर्वी ही गाडी रणबीर कपूर व जान्हवी कपूर यांनी खरेदी केली होती. शाहरुख खानच्या कारचं कलेक्शन ३१ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आणि त्यात जगातील काही प्रसिद्ध वाहनांचा समावेश आहे. शाहरुखच्या गाड्यांच्या कलेक्शनमध्ये बुगाटी वेरॉन, बेंटले कॉन्टिनेंटल जीटी, बीएमडब्ल्यू, ऑडी ए6 आणि रोल्स रॉयस, फँटम कूपर सारख्या अनेक महागड्या गाड्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

आणखी वाचा – “घन:श्यामवर कोणी विश्वास ठेवू नये”, सूरजच्या लग्नावरुन जान्हवीचं भाष्य, म्हणाली, “आवडीची मुलगी…”  

शाहरुखकडे असलेल्या सर्वात महागड्या कारपैकी एक म्हणजे रोल्स-रॉइस कलिनन, जी जगभरात अतिशय महाग आणि अलिशान कार मानली जाते. शाहरुखच्या तिन्ही मुलांकडे अतिशय महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे. त्याची मुलगी सुहाना खान व मुलगा आर्यन खान यांच्याकडे मोठ्या कंपनीच्या अलिशान गाड्या आहेत. शाहरुखची तिन्ही मुलंही या चैनीचा आनंद घेतात. शाहरुख खानबरोबर त्याची तिन्ही मुलं काहीना काही कारणांमुळे चर्चेत राहत असतात.

आणखी वाचा – जान्हवी किल्लेकरने दिलेला शब्द पाळला, सूरज चव्हाणच्या गावी साजरी केली भाऊबीज, म्हणाली, “फक्त एक हाक…”  

शाहरुख खानचा छोटा अबराम खान नेहमीच त्याच्या गोंडस शैलीने व त्याच्यावरील संस्काराने साऱ्यांची मनं जिंकत असतो. अशातक त्याच्या या नवीन गाडीतील राईडने त्याने सर्वांची मनं जिंकली आहेत. दरम्यान, शाहरुखच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर त्याने नुकताच ‘डंकी’, ‘पठाण’सारखे अनेक चित्रपट दिले असून त्याच्या आगामी चित्रपटांची आता चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.   

Tags: shah rukh khanShah Rukh Khan Bought Car For AbramShah Rukh Khan News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Marathi actress Vishakha Subhedar expressed her feelings by sharing a special social media post on the occasion of Bhaubeej

दुबईवरुन भाऊ येताच माहेरपणाच्या आठवणीत रमल्या विशाखा सुभेदार, डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट, कौतुकाचा वर्षाव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.