शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

जान्हवी किल्लेकरने दिलेला शब्द पाळला, सूरज चव्हाणच्या गावी साजरी केली भाऊबीज, म्हणाली, “फक्त एक हाक…”  

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 5, 2024 | 1:15 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 fame actress Janhavi Killekar went to Suraj Chavan village to celebrate Bhaidooj photo shared on social media

जान्हवी किल्लेकरने सूरज चव्हाणच्या गावी जात साजरी केली भाऊबीज, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व हे मानवी भावभावनांचे होते. या घरात सुरुवातीला एकमेकांचे शत्रू असलेले स्पर्धक आता एकमेकांचे चांगलेच मित्र झाले आहेत. त्यामुळे ‘बिग बॉस’चे पर्व संपले असले तरीही या घरातील स्पर्धक एकमेकांबरोबरचे नाते जपताना पाहायला मिळत आहेत. ‘बिग बॉस’च्या घरात सूरजने अनेकांबरोबर खास नाते निर्माण केले. पॅडी, अंकिता, डीपी, निक्की यांच्यासह जान्हवीबरोबर त्याने खास नाते निर्माण केले. या घरात त्याने अंकिता व जान्हवी यांना आपली बहीण मानली. ‘बिग बॉस’च्या घरात सुरुवातील जान्हवी व सूरज यांच्यात अनेक खटके उडालेले पाहायला मिळाले. मात्र, कालांतराने या दोघांच्या वादाचं रुपांतर भावा-बहिणीच्या सुंदर अशा नात्यात झालं.  (Janhavi Killekar Suraj Chavan Bhaubeej)

रक्षाबंधनाच्या सणाला जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाण यांनी ‘बिग बॉस’च्या घरात रक्षाबंधन साजरं केलं होतं. तेव्हाच अभिनेत्रीने आपण भाऊबीज सुद्धा साजरी करायची असं सूरजला सांगितलं होतं. काही दिवसांपूर्वीच जान्हवीने सूरजच्या मोढवे गावी जाऊन त्याची भेट घेतली होती. यावेळी ती भाऊबीजेला पुन्हा येईन असं म्हणाली होती. अखेर अभिनेत्रीने तो शब्द खरा करून दाखवला आहे. जान्हवीने सूरजच्या गावी जात त्याच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली आणि त्यांच्याबरोबर वेळ घालवला. जान्हवीला पाहून सूरजही खूप खुश दिसला आणि त्याने तिला पाहताच घट्ट अशी मिठी मारलेली पाहायला मिळाली.

View this post on Instagram

A post shared by Jahnavi Kiran Killekar (@jahnavikillekar)

आणखी वाचा – पुरस्कार सोहळ्यात प्रसाद ओकला मिळाली नव्हती एन्ट्री, निर्मात्याचं बोलणं जिव्हारी लागल्यानंतर स्वत:ला सिद्ध केलं अन्…; त्याच चॅनेलचा जिंकला शो

दिवाळीनिमित्त जान्हवीने बिग बॉसचं ब्रेसलेट घेतल्याचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओखाली अनेकांनी तिला सूरजबरोबर भाऊबीज साजरी करणार की नाही असं विचारलं होतं. यावर जान्हवीने “जाणार आहे” असं उत्तर दिलं होतं. हा शब्द आता जान्हवीने खरा केला आहे. जान्हवीने सूरजबरोबर भाऊबीज साजरी केली असून याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याचबरोबर या फोटोसह तिने असं म्हटलं आहे की, “तु फक्त एक हाक मार मी कायम तुझ्या सोबत आहे”. जान्हवीबरोबर सूरजच्या गावी जान्हवीचा नवरा व तिचा मुलगाही होता.

आणखी वाचा – “घन:श्यामवर कोणी विश्वास ठेवू नये”, सूरजच्या लग्नावरुन जान्हवीचं भाष्य, म्हणाली, “आवडीची मुलगी…”  

दरम्यान, सूरजचं बालपण अत्यंत बेताच्या परिस्थिती गेलं. लहानपणीच त्याच्या डोक्यावरील आई-बाबांचं छत्र हरपलं. यानंतर त्याच्या बहि‍णींनी त्याचा सांभाळ गेला. पण, ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश घेतल्यावर सूरज आता अवघ्या महाराष्ट्राचा लाडका मुलगा झाला आहे. घरामध्ये त्याला जान्हवी, अंकिता, इरिनाच्या रुपात आणखी काही बहिणी मिळाल्या आहेत आणि या बहीणींबरोबरचे नाते तो निभावत आहे. सूरज-जान्हवीच्या या फोटोला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

Tags: janhavi killekarJanhavi Killekar Suraj Chavan BhaubeejSuraj Chavan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
salman khan murder threat

सलमान खानकडून पाच कोटींची मागणी, धमकी देणारा लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ, १० दिवसांत तीन वेळा धमकावलं आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.