रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“घन:श्यामवर कोणी विश्वास ठेवू नये”, सूरजच्या लग्नावरुन जान्हवीचं भाष्य, म्हणाली, “आवडीची मुलगी…”  

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 5, 2024 | 12:10 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Actress Janhavi Killekar talk on Bigg Boss Marathi 5 winner Suraj Chavan's marriage

बिग बॉस मराठी ५ विजेता सूरज चव्हाणच्या लग्नाबद्दल अभिनेत्री जान्हवी किल्लेकरचं भाष्य, म्हणाली..

‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व आता संपले असले तरी या पर्वातील प्रत्येक स्पर्धकाची चर्चा होताना दिसत आहे. बारामतीच्या सूरज चव्हाणने या शोचे विजेतेपद पटकावले. ‘बिग बॉस’च्या घरात सुरुवातीला त्याला खेळ कळत नव्हता. पण हळूहळू त्याने आपली या खेळातील रंगत दाखवायला सुरुवात केली आणि अखेरपर्यंत जात या शोचे विजेतेपदही जिंकले. ‘बिग बॉस’च्या घरात सूरजच्या लग्नाविषयीचा मुद्दा बराच गाजला. या घरात सूरजने अनेकदा त्याच्या लग्नाबद्दल भाष्य केलं आहे. त्याला नेमकी कशी मुलगी हवी आहे? याबद्दल त्याने अनेकदा भाष्य केलं आहे. अशातच आता त्याच्या लग्नावर जान्हवीने भाष्य केलं आहे. (Janhavi Killekar on Suraj Marriage)

‘बिग बॉस’ संपल्यानंतर घरातील स्पर्धक एकमेकांच्या भेटी घेत आहेत. यानिमित्ताने अनेकजण सूरजच्या गावी जाऊन त्याला भेटत आहेत आणि त्याच्याबरोबर खास क्षण घालवत आहेत. इरीना, धनंजय, वैभव, पुरुषोत्तमदादा तसेच घन:श्याम यांनी सूरजच्या गावी जाऊन भेट घेतली असल्याचे पाहायला मिळाले. अशातच नुकतीच अभिनेत्री जान्हवी किल्लेकरदेखील सूरजची भेट घ्यायला त्याच्या गावी गेली होती. याचे काही खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी स्थानिक वृत्तवाहिनीकडून जान्हवीला सूरजच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले.   

View this post on Instagram

A post shared by surajcha_diwana (@surajchadiwana_005)

आणखी वाचा – पुरस्कार सोहळ्यात प्रसाद ओकला मिळाली नव्हती एन्ट्री, निर्मात्याचं बोलणं जिव्हारी लागल्यानंतर स्वत:ला सिद्ध केलं अन्…; त्याच चॅनेलचा जिंकला शो

यावेळी प्रश्न विचारणाऱ्याने “घन:श्यामने सूरजला मुलगी बघितली आहे तशी तुमच्या नजरेत कुणी आहे का?” असं विचारलं. यावर जान्हवी घन:श्याम विषयी असं म्हणाली की, “घन:श्यामवर कोणी विश्वास ठेवू नये. तो फसवतो”. यापुढे ती सूरजच्या लग्नाबद्दल असं म्हणाली की, “माझ्या डोक्यात तरी असं कुणी नाही. सूरज त्याच्यासाठी मुलगी नक्कीच शोधेल आणि त्याने ती शोधल्यानंतर मला तो नक्कीच दाखवेल. फक्त सूरजला त्याच्या आवडीची मुलगी मिळूदेत असं मला वाटतं”.

आणखी वाचा – Bigg Boss नंतर जान्हवी किल्लेकर पहिल्यांदाच गेली माहेरी, आईने औक्षण करत केले स्वागत, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, सूरजने ‘बिग बॉस’च्या घरात सूरजने याआधी एका अनाथ मुलीबरोबर लग्न करुन तिच्या आयुष्यातलं हे एकटेपण दूर करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर त्याने त्याचं लग्न अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायचं आहे असंही म्हटलं आहे. तसेच ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर त्याने सध्या कामावर लक्ष देणार असल्याचेही सांगितले होते.  

Tags: janhavi killekarJanhavi Killekar on Suraj MarriageSuraj Chavan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
 Irina Rudakova Dance Video

"गरबा संपला ताई…", इरिना रुडाकोवाच्या डान्स व्हिडीओवर नेटकऱ्याची गंमतीशीर कमेंट, उत्तर देत म्हणाली, "हो मला…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.