शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“पुरुषांवरच अविश्वास दाखवला जातो आणि…”, घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेक बच्चनचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला, “राग येतो…”

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 4, 2024 | 5:43 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Abhishek Bachchan on Commitment In Relationships.

ऐश्वर्या रायबरोबर घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेक बच्चनचा नातेसंबंधांमधील बांधिलकीबद्दलच्या व्यक्तव्याचा जुना व्हिडीओ व्हायरल

गेले काही दिवस अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय ही जोडी चांगलीच चर्चेत आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि तिचा पती व अभिनेता अभिषेक बच्चन यांच्यात काहीही आलबेल नसून ते दोघे घटस्फोट घेणार असल्याचे वृत्त आहे. कया. काही दिवसांपूर्वी अभिषेक व निम्रत कौर यांच्या नात्याबद्दलही अनेक चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहेत. दरम्यान, अभिनेत्री सिमी ग्रेवालने सोशल मीडियावर बच्चन कुटुंबाचा बचाव केला आहे. बच्चन कुटुंबाशी घनिष्ठ नातेसंबंधांसाठी ओळखले जाणारी सिमी ग्रेवालने अभिषेकचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो नातेसंबंधांमधील बांधिलकी आणि निष्ठा यावर आपले मत व्यक्त करत आहे. (Abhishek Bachchan on Commitment In Relationships)

सिमी ग्रेवालने शेअर केलेला व्हिडीओ तिच्या लोकप्रिय शो Rondeevu with Simi Grewal मधील आहे, ज्यामध्ये अभिषेकने २००३ मध्ये सहभाग घेतला होता. या व्हिडीओमध्ये, अभिनेता असं म्हणाला की, “मला जुन्या पद्धतीचा म्हणा, परंतु मला मनमोकळ्या स्वभावाच्या लोकांबरोबर राहायला काहीच हरकत नाही. मला मजा करायची इच्छा असलेल्या लोकांमध्ये राहण्यात काही अडचण नाही. परंतु जर तुम्ही कोणत्याही स्तरावर एखाद्याशी वचनबद्धता केली असेल तर त्या वचनबद्धतेचे पालन करा, अन्यथा, ते नातेच बनवू नका”.

View this post on Instagram

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb)

आणखी वाचा – सांडपाणी, गटाराच्या पाण्यात उभं राहून शूट अन्…; CIDच्या शूटबाबत दयाचा मोठा खुलासा, म्हणाला, “कधीच तक्रार न करता…”

अभिनेता पुढे म्हणाला होता की, “मला वैयक्तिकरित्या असे वाटते की एक पुरुष म्हणून, जर तुम्ही एखाद्या स्त्रीशी वचनबद्ध असाल, जरी तुमचा तिच्या प्रियकराशी सामना झाला तरी तुम्ही तिच्याप्रती विश्वासू राहिले पाहिजे. पुरुषांवर सहसा खूप अविश्वासू असल्याचा आरोप केला जातो, मला हे कधीच समजले नाही आणि मी याच्याशी सहमत नाही. याचा मला राग येतो”. सिमीने यापूर्वी एका सोशल मीडिया पोस्ट केली होती आणि तिने असं  म्हटलं होतं की अमिताभ यांनी त्यांची मुलगी श्वेता बच्चन नंदासाठी ऐश्वर्या रायकडे दुर्लक्ष केले.

आणखी वाचा – मोठा निर्णय! श्रद्धा कपूरने थेट नाकारला ‘पुष्पा २’, क्षणाचाही विचार न करता मोठी चूक कारण…

दरम्यान, ऐश्वर्या रायने ०१ नोव्हेंबरला तिचा ५१  वा वाढदिवस साजरा केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बच्चन कुटुंबाने अभिनेत्रीला शुभेच्छा देण्यासाठी कोणतीही पोस्ट शेअर केली नाही. चाहत्यांनी याची खूप दखल घेतली. याआधी जुलैमध्ये ऐश्वर्या रायने अनंत अंबानींच्या लग्नात मुलगी आराध्याबरोबर हजेरी लावली होती. तेव्हापासून अभिषेक व ऐश्वर्या यांच्या नात्याबद्दलच्या चर्चा होत आहेत.  

Tags: abhishek bachchanAbhishek Bachchan's Opinion on Commitment in Relationshipsbollywood actor
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Next Post
Nikki Tamboli And Arbaaz Patel

वहिनी म्हणून हाक मारताच लाजली निक्की तांबोळी, अरबाज पटेलबरोबर लवकरच लग्न करणार?, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.