Rupali Ganguly Step Daughter Esha Verma : ‘अनुपमा’ मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रुपाली गांगुली. या मालिकेनंतर ती सर्वाधिक मानधन घेणारी टीव्ही अभिनेत्री बनली. अभिनेत्रीच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे. पण अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिलेली पाहायला मिळाली. रुपाली गांगुली ही अश्विन मेहरा यांची दुसरी पत्नी आहे. त्याच्या पहिल्या पत्नीच्या दोन मुलींपैकी एका मुलीने सोशल मीडियावर या अभिनेत्रीचा पर्दाफाश करत आपला संताप व्यक्त केला आहे. तिचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.
अलीकडे, एका Redditor ने अश्विन के मेहरा यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी ईशा वर्माची जुनी पोस्ट शेअर केली आहे. चार वर्षांपूर्वीच्या स्क्रीनशॉटमध्ये, ईशा वर्माने तिचे वडील अश्विन के मेहराबरोबर रुपालीच्या लग्नाचे सत्य उघड केले आहे. तिने केवळ तीन वर्षांची असताना तिच्या वडिलांबरोबर विवाहबाह्य संबंध ठेवल्याचा आरोप अभिनेत्रीवर केला. ईशा म्हणाली की, रुपालीने तिला तिचे वडील अश्विनपासून वेगळे केले आहे आणि तिला त्याच्याशी बोलू देत नाही.
पोस्टमध्ये लिहिले आहे की, “हे अत्यंत दयनीय आहे. रुपाली गांगुलीची खरी कहाणी कुणाला माहित आहे का? अश्विन के वर्माचे दुसरे लग्न झालेले असताना तिचे बारा वर्षे प्रेमसंबंध होते. अश्विन यांना त्याच्या आधीच्या लग्नापासून दोन मुली आहेत. ती एक क्रूर मनाची स्त्री आहे, जिने मला आणि माझ्या बहिणीला माझ्या वडिलांपासून वेगळे करण्याचा प्रयत्न करण्याशिवाय काहीही केले नाही. मुंबईत येण्यापूर्वी वडील १३-१४ वर्षे कॅलिफोर्निया आणि नंतर न्यू जर्सी येथे राहिले”.

पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, “जेव्हा मी माझ्या वडिलांना फोन करण्याचा प्रयत्न करते तेव्हा रुपाली मला आणि माझ्या आईला मारण्याची धमकी देऊ लागते. हे बरोबर नाही, तिने माझ्या वडिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केले. तिने तिला हवे ते मिळवण्यासाठी इतरांचा नाश केला.”.आता या पोस्टच्या आधारे रुपाली व अश्विन यांच्या पहिल्या पत्नी आणि मुलांबरोबरच्या नात्याबद्दल काहीही बोलणे चुकीचे ठरेल. कारण रुपाली व ईशा या दोघीही एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो करतात. एवढेच नाही तर रुपालीने ईशाच्या आई-वडिलांची एक पोस्टही लाईक केली होती. एवढेच नाही तर ईशाने रुपाली व अश्विनबरोबरचा एक सुंदर फोटोही पोस्ट केला होता.