शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

स्वत:च्या वाढदिवशी शाहरुख खानचे प्रॉपर्टीच्या हिस्स्यांबद्दल मोठं भाष्य, म्हणाला, “सुहाना…”

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 3, 2024 | 10:28 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bollywood actor Shah Rukh Khan made a big comment about his property stake on his birthday.

वाढदिवशी शाहरुख खानचे स्वत:च्या प्रॉपर्टीबद्दल भाष्य, कुणाला अधिक हिस्सा?

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने कठोर परिश्रम करून आज स्टारडमचे स्थान प्राप्त केले आहे. शाहरुख खानची फॅन फॉलोइंग भारतातच नाही तर परदेशातही आहे. शाहरुख खान जगातील श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत आहे. नुकताच अभिनेत्याने त्याच्या साठीमध्ये प्रवेश केला आहे. २ नोव्हेंबर बॉलिवूडच्या किंग खानचा ५९ वा वाढदिवस झाला. दरवर्षी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी, शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी लाखो चाहते येतात. काहीजण तर दोन-दोन दिवस आधीच ‘मन्नत’बाहेर येऊन बसलेले असतात. त्यांना फक्त आपल्या लाडक्या अभिनेत्याची एक झलक हवी असते. त्याला भरभरून शुभेच्छा आणि आशिर्वाद द्यायचे असतात. शाहरुख खानने यंदा वाढदिवसाची एक परंपरा मोडली.  (Shah Rukh Khan on property distribute)

दरवर्षी तो त्याच्या वाढदिवसाचा आपल्या घराच्या बाल्कनीतून आपल्या चाहत्यांना भेटायला यायचा ते यावर्षी त्याने केले नाही. मात्र, आता त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून लोकांचे आभार मानले आहेत. याशिवाय त्याने आपला ५९ वा वाढदिवस कसा साजरा केला हे सांगितले. शाहरुख खानने त्याच्या वाढदिवसानिमित्त एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो त्याची सिग्नेचर पोज देताना दिसत आहे. तसेच या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “माझ्या वाढदिवसाला आल्याबद्दल आणि माझी संध्याकाळ खास बनवल्याबद्दल सर्वांना धन्यवाद… माझ्या वाढदिवसाला आलेल्या सर्व लोकांना माझे प्रेम आणि जे येऊ शकले नाहीत त्यांनाही माझे खूप प्रेम”.

See what Shah Rukh Khan has to say about his kids when a fan asks whose side he takes during their sibling squabbles! 😃😃

HBD WORLDS BIGGEST STAR #HappyBirthdaySRK#HappyBirthdayShahRukhKhan #HBDSRK #SRKDay @iamsrk pic.twitter.com/kCrmrv3LfT

— Shah Rukh Khan Universe Fan Club (@SRKUniverse) November 2, 2024

आणखी वाचा – दिवाळीच्या ‘त्या’ प्रश्नावर भडकला अभिनेता, पत्रकाराचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला अन्…; व्हिडीओ व्हायरल

शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या फॅन क्लबने बांद्रामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते, ज्यामध्ये तो सहभागी झाला होता. या कार्यक्रमाचे नाव होते, ‘SRK Day’. शाहरुखच्या या वाढदिवस स्पेशल कार्यक्रमाचे अनेक व्हिडीओ सध्या सोसल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि यापैकी एक व्हिडीओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे, तो म्हणजे त्याने प्रॉपर्टीच्या हिस्स्याबद्दल केलेल्या व्यक्तव्याचा. शाहरुखच्या ‘SRK Day’ या वाढदिवस स्पेशल कार्यक्रमामध्ये एका चाहत्यांनी त्याला असा प्रश्न विचारला की, “जर त्याच्या मुलांमध्ये भांडण झाले तर तो कोणाच्या बाजूने असतो?”

आणखी वाचा – 03 November Horoscope : मेष, कन्या व तूळ राशीच्या लोकांना मिळणार नोकरीत बढती मिळेल, रविवार विशेष राशीभविष्य

यांचे उत्तर देत शाहरुख म्हणाला की, “असं त्यांच्यात फार होत नाही. मी पण हाच विचार करत आहे. माशाअल्लाह, आजपर्यंत त्यांच्यात भांडण झाले नाही आणि पुढे होऊ पण नयेत. नाहीतर प्रॉपर्टीचे हिस्से करताना मोठी अडचण निर्माण होईल. पण तरीही मी सुहानाची बाजू घेईन. कारण मुली ठीक असतात. मला मुली सुंदर आणि गोंडस वाटतात.  त्यामुळे मी सुहानाला साथ देईन आणि तिच्या पाठीश भक्कम उभा राहून संपुर्ण ताकदीने तिचे समर्थन करेन”.

Tags: Bollywood entertainment newsShah Rukh Khan BirthdayShah Rukh Khan on property distribute
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
muzammil ibrahim  On deepika padukone
Entertainment

तिने प्रपोज केलं, दोन वर्ष रिलेशनमध्ये होतो आणि…; दीपिका पदुकोणच्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडचा खुलासा, कोण आहे मुजम्म‍िल इब्राहिम?

जून 6, 2025 | 11:02 am
Next Post
Bigg Boss Marathi 5 Irina Rudakova celebrated this year's bhaubeej with Dhananjay Powar and she shared the video on social media.

Bigg Boss Marathi फेम ‘परदेसी गर्ल’ इरीनाने लाडक्या डीपी दादांबरोबर साजरी केली यंदाची भाऊबीज, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.