सध्या सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरु आहे. देशभरात सर्वत्र मोठ्या उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे. मात्र या वर्षी दिवाळीच्या तारखेबद्दल गोंधळ दिसून येत आहे. कार्तिक महिन्याच्या अमावस्येला दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. काही जण ३१ तारखेला दिवाळी साजरी करणार आहेत तर काही जण १ नोव्हेंबर रोजी दिवाळी साजरी करणार आहे. देशभरातील अनेक विद्वान व ज्योतिषांनी दिवाळी संदर्भात तिथीबद्दल विचार व्यक्त केले आहेत. त्यांनी पंचांगानुसार तारखेचा गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. (diwali muhurt 2024 )
दिल्लीमध्ये या वर्षी दिवाळी दोन दिवस साजरी केली जाऊ शकते. सरकारी कार्यालयांना ३१ ऑक्टोबर रोजी सुट्टी आहे तर मोठ्या मंदिरांमध्ये एक नोव्हेंबर रोजी साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळे लोकांमध्ये खूप गोंधळ निर्माण झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, कृष्ण पक्षाच्या अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते. ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.५२ मिनिटांनी सुरु होणार आहे. दिवाळीच्या दिवशी संध्याकाली लक्ष्मीपूजन केले जाते. १ नोव्हेंबरला सकाळी ६.१५ मिनिटांपर्यंत हा मुहूर्त राहणार आहे. यानंतर लक्ष्मीपूजन केले जाऊ शकणार नाही. त्यामुळे ३१ ऑक्टोबर रोजी दिवाळी साजरी करणे शुभ मानले जाणार आहे.
त्याचप्रमाणे मुंबईमध्येदेखील सर्वत्र रोषणाई करण्यात आली आहे. ज्योतिष शास्त्रानुसार एक नोव्हेंबर रोजी दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. यावर्षी कार्तिक आमावस्या ३१ ऑक्टोबर ३.५४ वाजता सुरु होऊन १ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६.१७ वाजता समाप्त होणार आहे.
दरम्यान जे लोक ३१ ऑक्टोबर रोजी दिवाळी साजरी करणार आहेत त्यांच्यासाठी प्रदोष काळ व वृषभ काळ पूजनासाठी शुभ मुहूर्त मानले जात आहेत. प्रदोष काळ संध्याकाळी ५ वाजल्यापासून ३६ मिनिटांपासून रात्री ८.११ मिनिटांपर्यंत राहणार आहेत. वृषभ काळ संध्याकाळी ६.२० वाजल्यापासून ८.१५ वाजेपर्यंत राहणार आहे. या दरम्यान लक्ष्मी पूजन केले जाऊ शकते.