Prarthana Behere Friends Video : देशभरात सर्वत्र दिवाळी सणाची धामधूम पाहायला मिळत आहे. सगळेचजण दिवाळी स्पेशल तयारी करण्यात व्यस्त आहेत. अनेक कलाकार मंडळी तर फराळ बनवतानाचे तसेच साफसफाई करतानाचे फोटो, व्हिडीओ पोस्ट करताना दिसत आहेत. अशातच कलाविश्वातील काही कलाकार मंडळी एकत्र येत दिवाळी सेलिब्रेशन करणार असल्याचं समोर आलं आहे. मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या घरी रियुनियन होणार असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.
पूजा सावंतची बहीण रुचिरा हिने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये पूजा सावंत, प्रार्थना बेहेरे व तिचा पती अभिषेक जावकर, भूषण प्रधान, वैभव तत्त्ववादी, अनुषा दांडेकर अशी कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या सर्व कलाकारांची खूप जवळची मैत्री आहे. पूजाच्या लग्नात हे सगळे मित्र एकत्र भेटले होते. आणि आता पुन्हा एकदा ही टीम प्रार्थना बेहेरेच्या अलिबागच्या नव्या घरात एकत्र जमलेली पाहायला मिळत आहे.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पूजा सावंत “प्रार्थना बेहेरे इथेच राहतात का?” असं विचारते. यानंतर प्रार्थना दरवाजा उघडून आपल्या मित्रांची गळाभेट घेते. गेटवे ऑफ इंडिया वरुन बोटीने प्रवास करत ही टीम प्रार्थनाच्या अलिबागच्या घरी पोहोचली आहे. यंदाची दिवाळी हे सगळेजण मिळून प्रार्थनाच्या अलिबाग येथील घरी साजरी करणार आहे. दरम्यान, पूजा सावंतची ही लग्नानंतरची पहिली दिवाळी असणार आहे. यापूर्वीचे अनेक सण पूजाने नवऱ्याबरोबर ऑस्ट्रेलियात साजरे केले होते.
वर्षभरापूर्वी मुंबई सोडून अलिबागला शिफ्ट होण्याचा निर्णय प्रार्थना व तिच्या कुटुंबीयांनी घेतला. अभिनेत्रीचा पती अभिषेक जावकरचं अलिबागमध्ये सुंदर असं फार्महाऊस आहे. याची झलकही या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतेय. खूप छान इंटेरिअर असलेलं आणि भव्य असा हॉल असलेलं हे प्रार्थनाचं घर लक्षवेधी आहे. प्रार्थनाच्या या घराची सफर करायला भेट घ्यायला आता तिचा मित्रपरिवारही तिच्या घरी पोहोचला आहे. याठिकाणी प्रार्थनाचे संपूर्ण कुटुंबीय आनंदाने राहतात.