बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा कायमच चर्चेत राहणारा अभिनेता आहे. त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच आतादेखील अभिनेता शाहरुख त्याच्या एका व्हायरल व्हिडीओंमुळे चर्चेत आला आहे. शाहरुख खानने दुबईतील एका पार्टीमध्ये सासूबाई सविता छिब्बर यांच्याबरोबर डान्स केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शाहरुख खान मुलगा आर्यन खानच्या ब्रँड इव्हेंटसाठी दुबईत गेला होता. यावेळी शाहरुख दुबईतील डायवोला येथे एका पार्टीत उपस्थित होता. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये शाहरुख खान सासू सविता छिब्बर यांचा हात धरून नाचताना दिसत आहे. आपल्या जावयाबरोबर डान्स करताना सविता थोड्या लाजत होत्या. (Shah Rukh Khan Dance With Mother in law)
सासू व जावयाचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूपच चर्चेत आहे. शाहरुखचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या ‘पठाण’ चित्रपटातील ‘झूम जो पठाण’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तो या गाण्याची हुक स्टेप करताना देत आहे. शाहरुखला डान्स करताना पाहून अनेक चाहतेदेखील या गाण्यावर थिरकतात. नंतर शाहरुखने जेव्हा त्याची सिग्नेचर पोज दिली तेव्हा चाहते आनंदाने ओरडल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
Father Daughter Bonds Always
— ♥️Zarmeen Khan♥️ (@Zarmeenkhan221) October 28, 2024
Special❤️ #ShahRukhKhan #SuhanaKhan #King #AryanKhan #DYAVOLAfterDarkDXB #Dyavol pic.twitter.com/BAtvMuZpOB
पार्टीमध्ये शाहरुख खान याने लेक सुहाना खान हिच्यासोबत देखील डान्स केला. दोघांचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. शाहरुख खान लेकीसोबत ‘घूंघरू टूट गए’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. शाहरुख खानचे चाहते केवळ भारतातच नाही तर, सातासमुद्रापारही फार मोठी आहे. तसंच सोशल मीडियावरील त्याचा चाहतावर्गही बराच मोठा आहे.
Father Daughter Bonds Always
— ♥️Zarmeen Khan♥️ (@Zarmeenkhan221) October 28, 2024
Special❤️ #ShahRukhKhan #SuhanaKhan #King #AryanKhan #DYAVOLAfterDarkDXB #Dyavol pic.twitter.com/BAtvMuZpOB
आणखी वाचा – “आयुष्यातील हळवा क्षण…”, ‘शिवा’ला पुरस्कार मिळताच भावुक पोस्ट, स्टेजवरही रडली, म्हणाली, “सातत्याने काम…”
दरम्यान, शाहरुखने २०२३ मध्ये पाच वर्षांनी दमदार पुनरागमन केलं आणि एका वर्षात ‘जवान’, ‘पठाण’, ‘डंकी’ हे तीन सुपरहिट चित्रपट दिले. शाहरुख खान लवकरच त्याची मुलगी सुहाना खानबरोबर मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ‘किंग’ या चित्रपटात दोघे बापलेक एकत्र झळकणार असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अद्याप काही माहिती समोर आलेली नाही. पण २०२६ च्या ईदला प्रदर्शित होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.