सध्या देशभरात सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरु आहे. काही दिवसांवरच हा सन येऊन ठेपला आहे. सर्व ठिकाणी घर दिव्यांनी उजळून निघतात. घरोघरी पणत्या लावल्या जातात. दारात रांगोळी, सुगंधी उटणं, फटाक्यांची आतिशबाजी यामुळे सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते. पण याआधीच लहान दिवाळी साजरी केली जाते. हिंदू पंचांगानुसार, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षात चतुर्दशी साजरी केली जाते. या दिवशी भगवान शंकर, भगवान कृष्णा, भगवान राम भक्त हनुमान, माता काली यांची पूजा केली जाते. या व्यतिरिक्त यमराजची पूजादेखील करण्यात येते. त्यामुळे या दिवशी नक्की काय केलं जातं? आणि कोणाची पूजा केली जाते याबद्दल आता आपण जाणून घेऊया. (narak chaturdashi 2024)
नरक चतुर्दशीच्या दिवशी यमराजासाठी दिवे लावले जातात. यामुळे व्यक्तीला कधीही अकाली मृत्यूचा सामना करावा लागत नाही. तसेच यमाचे नाव घेऊन दिवे लावल्यास व्यक्तीचे सर्व पापातून मुक्तता होते. पण या दिवशी काय करावे आणि काय करु नये? याबद्दल आपण जाणून घेऊया.
नरक चतुर्दशीच्या दिवशी काय करावे?
नरक चतुर्दशी सुर्योदयापूर्वी उठून शरीराला मोहरीचे तेल लावावे. त्यानंतर थंड पाण्याने आंघोळ करावी. असं केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. तसेच या दिवशी घराची चांगली स्वच्छता करावी. मंदिर व माता कालीची पूजा करा. यामुळए सर्व प्रकारच्या भीती नष्ट होतील. तसेच १४ दिवे लावून वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावे. तसेच या दिवशी कृष्णाची पूजा करावी यामुळे शुभ वार्ता तुमच्या कानी पडतील. त्याचप्रमाणे या दिवशी यमराजाचे नाव घेऊन दिवे लावण्याची परंपरा आहे. यामुळे अकाल मृत्यूचे भय कमी होण्यास मदत होते.
नरक चतुर्दशीच्या दिवशी काय करु नये?
नरक चतुर्दशीच्या दिवशी चुकूनही तामस अन्नाचे सेवन करु नये. मांस तसेच मद्यपान करु नये. तसेच या दिवशी नखं कापू नयेत. या दिवशी घरातील दक्षिण दिशेला खराब करु नये. तसेच यमराजाची पूजा करावी. या दिवशी कोणत्याही प्राण्याची हिंसा करु नये. त्याचप्रमाणे या दिवशी घरी झोपू नये. व्यक्तीला दानदेखील करु नये. असे केल्यास माता लक्ष्मी नाराज होऊ शकते आणि आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.