Arya Jadhav On Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ चा विजेता सूरज चव्हाणचं सर्वत्र अजूनही कौतुक होताना पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’ संपलं असलं तरी सूरजची सर्वत्र चर्चा होत आहे. ‘बिग बॉस’ संपल्यानंतर आता सगळेच स्पर्धक एकमेकांची भेट घेताना दिसत आहेत. अशातच ‘बिग बॉस’मधून मध्येच बाहेर पडलेली स्पर्धक आर्याने नुकतीच सूरज चव्हाणशी संपर्क साधला. आर्याने सूरजला व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधला. आर्या व सूरजचं ‘बिग बॉस’च्या घरात उत्तम बॉण्डिंग पाहायला मिळालं. बरेचदा ते एकमेकांशी संवाद साधताना दिसले. हे बॉण्ड आता घराबाहेरही पाहायला मिळतंय. कामात असल्याने सूरजची भेट न घेता तिने व्हिडीओ कॉलद्वारे त्याच्याशी संपर्क साधला आणि त्याची विचारपूस केली.
सुरुवातीला आर्याकडे सूरजचा नंबर असल्याने तिचा त्याच्याशी संपर्क होत नव्हता. मात्र आधी सध्या कॉलद्वारे ती बोलताना म्हणाली, “हॅलो कोण बोलतंय”. यावर सूरज आर्याला म्हणतो, “कोण पाहिजे?”. तेव्हा सूरज म्हणतो, “माझी बहीण मला कुठे सोडून गेली काय माहित”, असं म्हणतो. यावर आर्या म्हणते, “अरे खूप गडबड होती आणि तुझा अनोळखी नंबर असल्याने मी फोन उचलला नाही”. यावेळी आर्याचीही आईही सूरजशी बोलताना दिसली. आर्या जशी त्याची बहीण आहे तशी मी देखील तुझी आई आहे असा दिलासा त्यांनी सूरजला दिला आणि अमरावतीत त्यांच्या घरी त्याला आमंत्रित केलं.
सूरजला व्हिडीओ कॉल केल्यावर आर्याची आई सुद्धा सूरजशी बोलते, तेव्हा ती सूरजला सुरुवातीला त्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते. सूरजला आर्याची आई म्हणते, “सूरज तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तू आमच्याकडे ये. तू अमरावतीत नक्की ये. हे तुझं घर आहे. तू आर्याचा भाऊ आहेस ना तर हे घर पण तुझं आहे. कायम लक्षात ठेव अमरावतीत तुझं घर आहे आणि तू कधीही या घरी येऊ शकतोस. हे नातं शेवटपर्यंत निभवायचं”, असं आर्याची आई सूरजला बोलते.
आणखी वाचा – “तुला बघून खूप बरं वाटलं”, अंकिताच्या आईचा सूरज चव्हाणला व्हिडीओ कॉल, म्हणाला, “मी आहे ना तिचा भाऊ आणि…”
यावर सूरज आर्याच्या आईला म्हणतो, “मी असा माणूस आहे जो प्रत्येक नातं शेवट्पर्यंत निभावतो”. पुढे आर्याची आई सूरजला म्हणते, “ही शेवटपर्यंत तुझी बहीण राहणार. आणि शेवट्पर्यंत मी तुझी आई राहणार. आणि हे घरही शेवट्पर्यंत तुझं आहे”.