Ankita Walavalkar And Suraj chavan : ‘बिग बॉस मराठी’ ५ च्या पर्वात स्पर्धकांची अनेक नाती बनताना दिसली. यंदाच्या पर्वात एका भावा-बहिणीचं नातं विशेष चर्चेत राहिलं. ते म्हणजे रील स्टार सूरज चव्हाण व अंकिता वालावलकर. सूरज व अंकिता ही भावाबहिणीची जोडी बरीच चर्चेत राहिली. ‘बिग बॉस’च्या घरातही ही जोडी एकाच टीममध्ये पाहायला मिळाली शिवाय एकत्र खेळताना दिसली. आता ‘बिग बॉस’मधून बाहेर आल्यानंतर अनेकदा सूरज व अंकिताने एकमेकांशी फोनद्वारे संवाद साधला. यानंतर आता अंकिताने सूरजला व्हिडीओ कॉल केल्याचं पाहायला मिळालं.
अंकिताने सूरजला व्हिडीओ कॉल केला तेव्हा अंकिताची आई सुद्धा सूरजशी बोलली. अंकिता सध्या कोकणात तिच्या घरी आहे. ‘बिग बॉस’नंतर बऱ्याच दिवसांनी ती कोकणातील घरी गेली आहे. अंकिता कोकणात फिरतानाचे अनेक व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत आहे. गावाहून अंकिताने सूरजला व्हिडीओ कॉल केला होता. यावेळी अंकिताची आईही सूरजशी व्हिडीओ कॉलद्वारे बोलताना दिसली.
यावेळी बोलताना सूरज अंकिताच्या आईला म्हणाला, “हॅलो आई. मी तुम्हाला भेटलो नाही. भेटलो असतो तर नक्की आपण बोललो असतो”, असं म्हणतो. यावर सूरजची विचारपूस करत आणि त्याच्या खेळाचं कौतुक करत अंकिताची आई म्हणते, “खूप बरा खेळत होतास. तुला बघून खूप बरं वाटलं”. त्यावर सूरज म्हणतो, “मी बहिणीची किती काळजी घेत होतो”. तेव्हा अंकिताची आई हसून “होय तर”, असं म्हणते. यावर सूरज म्हणतो, “तिला म्हटलं मी भाऊ वगैरे काही नसतं, मी आहे ना भाऊ”.
आणखी वाचा – रणबीर कपूर पापाराझींवर ओरडताच आलिया घाबरली, पार्टीतून बाहेर आल्यावर घडला ‘हा’ प्रकार, नेमकं काय झालं?
अंकिताने सूरजच्या घराबाबतही अपडेट दिली आहे. व्हिडीओ शेअर करत अंकिता म्हणाली, “आज सूरजच्या घराचं काम सुरु होतंय. मला आमंत्रण देण्यात आलं होतं. माझं आणि सूरजचं बोलणं झालं. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर मी बरेच दिवस घरी आले नव्हते, इतकंच नाही तर इथून मला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना सुद्धा मला भेटायचं आहे. ज्या लोकांनी माझ्यासाठी मेहनत घेतली त्या लोकांना वेळात वेळ काढून मी भेटत आहे. त्यामुळे मी इथून मुंबईत जाईन आणि मग मुंबईहून सूरजच्या गावी जाणार आहे. सूरजचं आणि माझं बोलणं झालं तो खूप खुश आहे”.