रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 18 मध्ये प्रेमाचे वारे, ईशा-अविनाशचं फुलतंय नातं, जोडी जमणार का?

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 22, 2024 | 12:58 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss 18 salman khan show Esha Singh and Avinash Mishra love story will start in the house

Bigg Boss १८ च्या घरात ईशा सिंग आणि अविनाश मिश्रा यांच्यात फुलणार प्रेम? नवीन प्रोमोमुळे चर्चांना उधाण

Bigg Boss 18 : सलमान खानचा वादग्रस्त रिॲलिटी शो ‘बिग बॉस १८’ खूप चर्चेत आहे, जिथे कधी घरातील सदस्यांमध्ये जोरदार भांडण होते तर कधी त्यांच्यात हशा पिकतो. बिग बॉसच्या घरात अनेकांना अनेकांवर प्रेम झाले आहे. यापैकी काहींचे प्रेम यशस्वी झाले आहे तर काहींचे या शोमध्ये किंवा शोमधून बाहेर पडताच प्रेम संपले आहे. अशातच ‘बिग बॉस १८’ घरातील सदस्यांमधील सततच्या वादानंतर आता काहीतरी नवीन पाहायला मिळणार आहे. ‘बिग बॉस १८’ मध्ये आता एक नवीन प्रेम कहाणी फुलणार आहे. ईशा सिंग आणि अविनाश मिश्रा यांच्यात काहीतरी घडणार असल्याचे पाहायला मिळणार आहे. (Bigg Boss 18 Esha and Avinash Love Story)

‘बिग बॉस’मध्ये नुकतेच सलमान खानने चाहत पांडेला विचारलं की “तिला कसा मुलगा आवडतो?” ज्यावर चाहतने उत्तर दिलं की “तिला करणवीर मेहरासारखा मुलगा आवडतो”. यानंतर त्यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात होऊ शकते अशी बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्या आहेत. अशातच एलिस कौशिकने ईशा सिंगला अविनाश मिश्राविषयी भावना असल्याचं सांगून घरात खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्यातील संभाषणादरम्यान, एलिस अविनाशला सांगते की तिला त्याच्या आणि ईशामध्ये काहीतरी वाटत आहे.

View this post on Instagram

A post shared by JioCinema (@officialjiocinema)

आणखी वाचा – Navri Mile Hitlerla : प्रेम बहरता बहरता एजे-लीलामध्ये होणार गैरसमज, नात्यात पुन्हा दुरावा येणार

एलिस “ईशा तुला आवडते का? असं म्हणत अविनाशला चिडवते. एलिसने हे सांगताच तिघांमध्ये चर्चा सुरू झाली. नंतर ईशा अविनाशला विचारते की, “एलिस काय म्हणाली?”. यावर अविनाश सांगतो की, “एलिसने ईशाबद्दल सांगितले पण ती मस्करी होती”. तेव्हा ईशा म्हणते की, “मी तुला सांगते. मी तुला खूप चांगला मित्र मानते. मला या सर्व गोष्टीचा तिरस्कार आहे आणि ते बिघडवण्याचा माझा हेतू नाही”. यावर अविनाशने तिला सांगितले की, “एलिस मस्करी करत होती”.

आणखी वाचा – वडील झाल्यानंतर प्रिन्स नरुलाचा आनंद गगनात मावेना, पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा, एकटक बघतच बसला अन्…

दरम्यान, ‘बिग बॉस १८’च्या नुकत्याच झालेल्या भागात घरातील सदस्यांशी भांडण झाल्यानंतर ‘बिग बॉस’ अविनाश मिश्राला तुरुंगात टाकतात. तसंच कुटुंबातील सदस्यांना किती राशन द्यायचे हे ते ठरवू शकतात असा अधिकार त्यांना देण्यात आला आहे. यानंतर अविनाश मिश्रा म्हणाला की, “जोपर्यंत करणवीर मेहरा त्यांची माफी मागत नाही तोपर्यंत कुटुंबीयांना राशन देणार नाही”. कुटुंबातील सदस्यांमधील या वादांमध्ये आता नवीन प्रेमकहाणी सुरू होते की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Tags: Bigg Boss 18 Show NewsEsha Singh Avinash Mishra Love StoryEsha Singh Avinash Mishra Love Story News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Ankita Walavalkar Emotional Post

"सहानुभूतीवरुन अनेक टोमणे मला मिळाले पण…", दिव्यांगांसाठी अंकिता वालावलकरचं काम, म्हणाली, "कोकणातही गेले नाही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.